पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० | पानसे घराण्याचा इतिहास. सुपूर्त केला होता, याचा सरकारी कागदोपत्री दाखला आम्हांस मिळाला नाही. तथापि शके १७३९ च्या खडकीच्या लढाईत हा तोफखाना पानशांच्या दिमतीस असल्याचे कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे. यावरून त्र्यंबकजीकडे तोफखान्याचे काम प्रत्यक्ष गेलें नाहीं असे आमचे मत आहे. याच वेळीं कान्होजीराव डफळे हे जतच्या गादीवर होते. रावबाजींची यांच्यावर हि गैरमज झाल्याकारणाने त्यांचे संस्थान जप्त करून ते त्र्यंबकजी डेंगळ्याचे ताब्यांत द्यावे असा हुकुम झाला. या जप्ती हुकुमास कान्होजीरावाने जुमानले नाहीं. तो तसाच दप्तरी कागदावरच राहिला. या हकीकतीवरून याप्रमाणे च पानशांचा तोफखाना त्र्यंबकजीचे ताब्यांत गेला नव्हता, या आमचे मतास पुष्टि मिळते. या सुमाराची हकीकत म्हणजे मराठीसाम्राज्याची प्रयाणकालाची कहाणी होय. ती साद्यंत नीटपणे मांडतां येईल अशी पहिल्या दर्जाचीं अगर दुय्यम दर्जाची पण अस्सल साधने अजून व्हावी तितकी उपलब्ध झालेली नाहींत. फक्त एक दोन स्वदेशीयांनी लिहून ठेविलेल्या बखरी व इंग्रज लोकांनी लिहिलेल्या हकीकती ही च काय ती त्या विषयाची सामग्री. पण पहिल्यांत आलेली माहिती त्रोटक आहे व दुस-यांत दिलेली हकीकत उघड उघड एक तर्फी आहे. यासाठी या प्रसंगाची आम्ही जी हकीकत देणार आहों ती हि त्रोटक च दिली जाणार हे उघड आहे. पुढे मागे अस्सल ऐतिहासिक पत्रे वगैरे साधने मिळाल्यास या माहितींत कमीजास्त फेरफार करणे अवश्य होईल. शिवाय या काळची माहिती मनास डागण्या देणारी असल्याने आम्हीं कागदपत्रांपलीकडे खेालांत न शिरतां फक्त पानसे घराण्याचा संबंध जेथे व जेवढा येईल तेवढी च हकीकत यापुढे देणार आहों. २. खडकीची लढाई व स्वराज्याचा शेवट, नाना फडणीसांच्या पश्चात् पेशवाईच्या कारभाराची माळ माणकेश्वर नांवाच्या हरिदासबोवांच्या गळ्यांत पडली. श्रीमंतांच्या भोंवतीं सर्व स्वार्थी व नादान लोकांचा पूर्णपणे गराडा पडला. त्या मतलबी लोकांनी पाहिलें कीं, मराठी साम्राज्य आतां सर्व बाजूने पोखरले गेले असून ते लवकरच कोसळून पडेल. तेव्हा त्याच्या नंतरची सत्ता दक्षिणेत बलवत्तर होईल तिला एव्हांपासून फितूर होऊन आपली कातडी व जहागिन्या शाबूत ठेवाव्या असा बेत पुष्कळ सरदारांनी केला आणि त्याप्रमाणे तो बेत त्यांना हळू हळू अमलांत आणण्यास सुरुवात हि केली. ही परिस्थिति श्रीमंतांना समजत नव्हती असे नाही. त्या साठी त्यांनी जी उपाययोजना केली, ती उंदराने आपण होऊन मांजराच्या खालीं आश्रयास जाण्यासारखी होती. या मांजराने वसईच्या तहापर्यंत आपले पंजे मऊ कापडाच्या हातमाजाने झांकले असल्यामुळे त्याचे खरे स्वरूप पहिल्याने श्रीमंतांच्या ध्यानांत आले नाहीं. श्रीमंत एकदा पंजाच्या पकडीत पक्के सांपडले असे ठरल्यावर ह्या मांजरानें आपले हातमोजे काढून टाकून आपली तीक्ष्ण नखं बाहेर काढ व उदराला