पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ पानसे घराण्याचा इतिहास. (पुण्याजवळील) येथील मैदानांत येऊन इंग्रजांशी लढाई देण्याचे तयारीने ते उभे राहिले. इकडे श्रीमंत पर्वतीवर गेले. लढाईस प्रारंभ तिसरे प्रहरी चार वाजण्याच्या सुमारास झाला. या वेळीं पेशव्यांचे कारभारी, मोर दीक्षित हे फितूर झाले होते. तसेच बाळाजीपंत नातू व यशवंतराव घोरपडे हे तर पहिल्यापासून पेशव्यांकडील बातम्या फोडून अलपिष्टनला मदत करीत होतेच. श्रीमंतांकडे या वेळीं वीस हजार घोडदळ, आठ हजार पायदळ, व वीस तोफा होत्या. गणपतराव यांचे मदतीस माधवराव कृष्ण पानसे हे होते. हे सैन्य चतुःशृंगीच्या टेकडीपासून संगमावरील रोसडेन्सीपर्यंत पसरलें. होते. इंग्रजांचे सैन्य हि पुष्कळ असून मराठ्यांच्या सैन्यासमोर दीड मैल अंतराने उभे होते. पेशव्यांच्या सैन्यांत डाव्या बगलेकडे मोर दीक्षित व विंचूरकर, उजव्या बाजूस बापू गोखले व मध्ये गणपतराव पानसे यांचा तोफखाना याप्रमाणे रांग धरून होते. ही रांग धरीत असतां अलापिष्टन हा रोसडेन्सी सोडून मेण्यांत बसून दापोडीच्या सैन्यास मिळण्यासाठी डावे बगलैकडील सैन्यांतून गेला. तो एकटाच होता तरी मोर दीक्षित वगैरेंनी त्याची नुस्ती वास्तपुस्त हि केली नाही. या वेळी श्रीमंत हे पर्वतीवर उत्तरेकडील गच्चीवर बसून लढाई पहात होते. पानशांनी सुरुवातीस महांकाळीं व दर्या भवानी या दोन तोफांचे मार सुरू केले. प्रथम कांही वेळ तोफांनी आवाज दिले व पुढे त्यांनी जाब देण्याचे नाकारीले याचे कारण फितुरी हे होय. ही फितुरी पुढील प्रमाणे झाली होती. पानशांच्या तोफांच्या माध्यापुढे आपला टिकाव लागणे कठिण अशी भीति इंग्रज सेनापतीस नेहमी असे. ही भीति, लढाई सुरू होण्यापूर्वी जी अवधि मिळाली त्या अवधींत एका स्वराज्यद्रोही नीच मनुष्याने दूर केली. त्यांनी तोफखान्यांतील दारूचे कोठारांतील नोकर फितूर करून दारूचे पोल्यांत भाजकी बाजरी मिसळून ठेविली. हा खेळ वेळीच खेळून ठेविल्यामुळे ऐनवेळी पानशांस तोफांनी दगा दिला. . लढाई रात्रीच्या आठ वाजेपर्यंत चालली होती, पुढे ती काळोख पडल्यावर थांबला. झालेल्या लढाईत कोणत्याच पक्षास जय मिळाला नाही. इंग्रज-लेखक पेशव्यांच्या सेनेचा पराभव झाल्याचे लिहितात, परंतु तें साफ चुकीचे आहे. लढाई संपल्यानंतर तोफखान्यांत फितुर करणारे देशद्रोही वीर अलफिष्टन साहेबाकडे बक्षिस मागण्या करितां गेले. त्या वेळी त्याने त्या नीचांची निर्भर्त्सना करून त्यांना जन्मभर कैदेत कुजत ठेवण्याचे परितोषिक दिले. मराठ्यांकडे सर्वत्र फितुरी माजल्याने आपला पराजय झाला असे खोटें च वर्तमान श्रीमंतांना फितूर झाल्यापैकी कोणी एकाने सांगितले. त्या समयीं त्यांनीं पर्वती सोडली ‘व बापदेवाचा घांट गांठला. रात्रीं रणभूमीवर राहिलेल्या आपल्या तोफा परत कशा काढाव्या याची पानशांना अडचण पडली, तरी हि तसल्या अडचणीतून त्यांनी दहा तोफा काढल्या व त्या