पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*प्रकरण आठवें. १०९ ध्यांनी आणावा, व जमाखर्चाची तोंड मिळवणी करून घ्यावी. हे भाषण ऐकून श्रीमंतास गहिंवर आला व डोळ्यांस पाणी आलें, - या प्रसंगाचा श्रीमंतांचे मनावर झालेला परिणाम फार दिवस टिकला नाही. शके १७२९ च्या सुमारास श्रीमंतांनीं आतां इंग्रजांशी सलोखा झाल्यामुळे लढाईचा प्रसंग नाहींसा झाला आहे, या सबबीवर पानशांकडील तोफखान्याचे काम काढून ते त्यांचा आवडता मंत्रि त्र्यंबकजी डेंगळे यांच्याकडेस सोंपविले. पानसे यांच्या पदरीं रूपराम: चौधरी नांवाचा तोफखान्याकडे एक अधिकारी होता, त्याला त्र्यंबकजीच्या हातांखालीं दुय्यम सरदारी दिली आणि पानसे यांच्याकडील तोफखान्याच्या अधिकाराचे सर्व काम काढून घेतले. अर्थात् त्या कामासाठी मिळालेली सरंजामी तैनात हि त्याबरोबर च काढून घेण्यांत आली हे वेगळे सांगणे नको च. फक्त जात-सरंजाम चाळीस हजारांचा ठेवण्यांत आला; आणि त्याखेरीज इनामें गांव, वतने, मानपान वगैरे ) चालू ठेविलीं. अशा रीतीने श्रीमंतांनी व त्यांच्या दुष्ट व अदूरदर्शी सल्लागारांनी जुन्या स्वामिनिष्ठ व पिढीजाद सरदारांस लहरीसरशी एका झटक्यांत दूर करून आपली मतलब साधला. रूपराम चौधरी हा रजपूत असून प्रथम पानशांचे तोफखान्यांत गाडीवान म्हणून नौकर राहिला. पुढे तो आपल्या कर्तबगारीने वाढत वाढत मोठ्या योग्यतेस चढला. त्याच्यावर पानशांचा हि चांगला भरंवसा होता. रूपराम हा शके १७३६ च्या ज्येष्ठ वद्य अमावास्येस मृत्यु पावला. त्यास औरस पुरुष संतति झाली नाही म्हणून त्याने दत्तक पुत्र घेऊन त्याचे नांव रामचंद्र असे ठेविलें. रामचंद्र हि निपुत्रिक च मरण पावला. याचा वाडा शुक्रवार पेठेत पंचमुखी मारुतीजवळ असून तो आजपर्यंत भाजेकर व चितळे यांच्या ताब्यात होता. वाड्यानज़ीक रूपराम याने एक मोठा हौद बांधिला असून त्यास अद्याप चौधयांचा हौद या नांवाने च लोक ओळखतात. स्वतंत्र नळ बांधून ह्या हौदांत पाणी आणलेले होते. परंतु हल्लीं म्युनिसिपालिटीने तो नळ बंद करून खडकवासल्याच्या तलावांतील पाणी ह्या हौदांत सोडलें आहे, • रूपराम चौधरी यांनी आपल्या अधिकाराच्या वेळीं एक नंग्या गोसाव्यांची पलटण तयार करून चाकरीस ठेविली होती व तिची सरदारकी त्याने मनोहरगीर गोसावी यांस दिली होती. वर सांगितले आहे की, पानशांकडील तोफखान्याचे काम काढूनं ते रावबाजींनीं आपळा प्रिय त्र्यंबकजी डेंगळे यास दिले. हा त्र्यंबकजी पहिल्याने पेशव्यांचे पदरीं जासूद म्हणून नोकरी करीत होता. बातम्या व पत्रे पचविण्यांतील याची चलाखी पाहून श्रीमंतांची याजवर मर्जी बसली; व ती वाढत जाऊन अखेर त्याने श्रीमंतांजवळून तोफखान्याची सरदारी मिळविली. त्र्यंबकजीकडे तोफखान्याचे काम, प्रत्यक्ष श्री. रावबाजींनी दिले होते किंवा नाहीं व दिले असल्यास त्याला कितपत अधिकार