पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ | पानले घराण्याचा इतिहास. १ लाः--रास्त्याच्या इष्टेटीची जप्ती करावी व पांडूजी कुंजर व त्र्यंबकजी डेंगळे यांचे मताप्रमाणे हरएक प्रसंगों वागावे म्हणून श्री. बाजीराव साहेब यांनी पानशांस हुकूम दिला. तो त्यांनी मानिला नाहीं. २ राः-पानशांनीं कर्नाटकांतील स्वाध्यांत लुटालूट करून अगणित संपत्ति आणली असून, सरकारांत तिचा भरणा केला नाहीं. सवब, त्यावद्दलचा त्यांनी हिशेब द्यावा अशी श्रीमंतानी मागणी केली त्यावर स्वारींत सैन्याच्या व तोफखान्याच्या अवाढव्य खर्चामुळे आपल्यास उलटें देणे जाहलें आहे असे पानशांनी श्रीमंतांस सांगितले, “परंतु श्रीमंतांस ते पंटलें नाहीं. ३ रा–बाजीराव साहेब यांनी आपली एकंदर नऊ लग्न केली तरी हि त्यांची विषय. वासना पूर्ण झाली नाही, त्यामुळे ते मधून मधून वाम मार्गाचा अवलंब करीत व त्यांच्या सभेतालच्या सल्लागारांची या कामी त्यांना मदत मिळे. गणपतराव पानसे यांची स्त्री सरस्वतीबाई ही फार रूपसंपन्न असल्याची बातमी श्रीमंताचे कानावर वेली. पुढे एके दिवशी कांहीं निामत्ताने सरकारांतून बाईंना भोजनाचे आमंत्रण दिले गेले. परंतु श्रीमंतांचे दुवर्तन सर्वीस ठाऊक असल्याने सरस्वतीबाईंनीं ते आमंत्रण स्वीकारलें नाहीं. इतकेच नव्हे तर कोणत्या हि कारणास्तव यापुढे श्रीमंतांच्या वाड्यांत पाऊल टाका• वयाचें नाहीं, असा त्यांनी संकल्प केला. आमंत्रण नाकारिले, हा आपला मोठा अपमान झाला म्हणून भोवतालच्या कुटाळ मंडळींनी श्रीमंतांच्या मनांत पानशाविषयीच्या रोषांत भर घातली, वरील कारणांमुळे श्रीमंतांचा पानशाविषयींचा द्वेष जास्त च वाढत चालला. शा. पतरावांनी एक वेळ श्रीमंतांची समक्ष गांठ घेऊन त्यांचा गैरसमज दूर करावा ह्या हेतूने आपले घरीं कांहीं सरदारांस मेजवानी देण्याचे ठरवून त्या निमित्त श्रीमंतास भोजनास पाचारण केले. या प्रसंगी सरस्वतीबाई आपल्या दृष्टीस तरी पडतील अशा आशेने श्रीमंतांनी ते आमंत्रण स्वीकारले. भोजनाचे वेळीं आचारी, वाढपे या पुरुष वर्गाखेरीज त्यांचे दृष्टीस बाईमनुष्य कोणी च पडले नाहीं. भोजनोत्तर, पुढील चौकांत पानसुपारीची बैठक घातली होती. माजघरांत वाटेवर कांहीं बायका बसल्या असून त्यांचे मधून पुढील चौकांत श्रीमंत आले. येतांना वाटेत त्यांनी माजघरांत बसलेल्या त्या बायका पाहिल्या; तेव्हां त्या सर्व बायका विधवा आहेत असे राववाजांना दिसून आले. पुढील चौकांत आल्यावर गणपतराव यांनी श्रीमंतांपुढे उभे राहून हात जोडून विनंति केली की, माजघरांतून येतांना आपण ज्या सर्व स्त्रिया पाहिल्या त्या सर्व माझ्या भावजया, चुलत्या वगैरे असून त्यांचे पति स्वामिकार्याकरितां युद्धांत पडल्याने आज त्या वैधव्यदशेत आयुष्याचे दिवस कंठीत आहेत. सर्वांच्या पतींनी स्वामिकार्यासाठी देह झिजविले असून शत्रूवर चढाई करतांना रणभूमीवर शिरें अई केलेली आहेत. हा सर्व आमच्या स्वाध्याशिका-यांचा जमाखर्च आहे. तो इन