पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. १०३ गोखले यास फार क्रोध आला व या अधम वाघास ठार केल्याशिवाय आपण पागोटे घालणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. नंतर बापू, पटवर्धन सरदार, गणपतराव पानसे व गोविंदराव सखदेव हे आपापल्या पथकांसह वेलस्ली यास जाऊन मिळाले. मग सर्वजण वाघाचे मागे फिरत असतां, नंदीहाळजवळ कवटाळभानूच्या मैदानांत वाघाची गांठ पडली. चहूबाजूंनीं गणपतराव यांनीं तोफा उभ्या करून वाघास कोंडले. वाघाने बाहेर पडून पळून जाण्यासाठी बरीच धडपड केली; परंतु त्चिा कांहीं उपयोग झाला नाहीं. तोफांच्या भडीमाराने वाघाचे बरेच सैन्य जखमी झालें व तो स्वतः एका अडचणीच्या जागी आश्रयास जाऊन उभा राहिला. बापू गोखले यांनी हे पाहून त्वेषाने त्याच्यावर चाल केली व सिंहाप्रमाणे उडी मारून वाघाला ठार केले. याप्रमाणे त्यांनी आपली भीष्म प्रतिज्ञा पुरी केली. । मागे सांगितल्याप्रमाणे परशुरामभाऊंनी शके १७२१ च्या वैशाखांत करवीरकरावर स्वारी केली. या स्वारीचा शेवट पट्टणकुडी येथील लढईत झाला. लढाईत भाऊ जखमी होऊन करवीरकरांच्या हाती सांपडले. करवीरकर महाराजांनी त्यांना त्वेषाने * मारा' म्हणून सांगितले; तेव्हां जवळ असलेल्या विश्वासराव गाईकवाडाने तरवारीचे वार करून या प्रख्यात सेनापतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. याप्रमाणे अशा अमानुष रीतीने शके १७२१ आश्विन वद्य चतुर्थीस भाऊंचा शेवट झाला. | ४. करवीरकरांवरील स्वारी. | भाऊंचा असा शोचनीय शेवट झाल्यामुळे पुणे दरबारांत फार गडबड उडाली. नाना फडणीस यांना फार दुःख झाले. या कृत्याचें उसने घेण्याचा त्यांनी तत्काळ निश्चय केला. शिंदे व त्यांचे कारभारी बाळोबा पागनीस यांची हि संमत त्यांना मिळाली. शिंद्याकडे स्वारीचे पुढारीपण देण्यांत आले. भाऊंचे चिरंजीव रामचंद्र आण्णा यांनी तर शत्रूवर सूड उगविण्याचा निश्चयच केला होता. नानांनी फौजेच्या व “ सरकारी तोफखान्याच्या खर्चाकरितां आगाऊ पांच लाख रुपये दिले. या फौजेत सुमारें तीन हजार स्वार, शिंद्यांची पांच पलटणे, शिवाय इतर पायदळ असून गणपतराव पानसे हे सरकारी तोफखाना घेऊन निघाले होते. * राजश्री गणपतराव पानसे मुहूर्ते करून डेप्यास गेले ' ( खरे ऐ. ले. सं. पृ. ६१६७ ). हे संकट येत आहेसे पाहून करवीरकरांनी पुणे दरबारांशी तहाचा घाट घातला, पण तो फिसकटला. पुण्याच्या फौजेची व रामचंद्र अण्णाच्या सैन्याची गांठ रेटरें येथे पडली. मग हे सर्व सैन्य कोल्हापूरकडे निघाले. वाटेत पानशांनी करवीरकरांच्या शिराळे या मजबूत ठाण्यावर तोफांचा मारा करून ते काबीज केले; व वारणेवर करवीरकरांची थोडीशी फौज होती तिला पिटाळून लाविलें. पेशव्यांचे सर्व सैन्य शके १७२१ च्या माघ शुद्धांत पन्हाळ्याचे माचीस पोहचले. त्या वेळी त्यांनी खालील प्रमाणे आपल्या सैन्याचा व्यूह रचिला. सर्वांच्या पुढे पानशांचा तोफखाना, त्याचे मागे डावे बाजूस चिंतामणराव व हरिपंत