पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ पानसे घराण्याचा इतिहास. याचा कंपू तयार करून तोफा नानांच्या वाड्या पलीकडे शिष्यांवर (उंचावर ) नेल्या आणि आज्ञा केली की, तोफा लावून वाडा पाडून टाकणे, आणि पानसे यांचा मुलगा धरला आहे तो सोडवून आणणे. हे ऐकून नेवासकर घाबरला आणि त्याने पानसे यांचा मुलगा सरकारच्या हवाली केला. याप्रमाणे सर्जेरावीचा प्रताप पानसे घराण्यास हि जाचला. | या वेळी श्रीमंतांनी महादजी वावांच्या बायकांना हातीं धरून दौलतरावास पेंचांत आणिलें, तेव्हां दौलतरावाने नानांस सोडून श्रीमंतांना अडचणीत आणण्याचे ठरविले. नानांनीं पंचवीस लक्ष रुपये देऊन दौलतरावाचा व बायांचा समेट करून द्यावा व दौलतरावाने पुन्हा नाना यास पेशव्यांचे कारभारी करावे असा तह ठरून नानांची सुटका झाली. नानांनी हि दौलतरावास ताबडतोब दहा लक्ष रुपये रोख दिले. इतक्यांत सर्व अनर्थाचे मूळ जो सर्जेराव यास दौलतरावानें कैद केले; यामुळे पुण्यांत तात्पुरती स्थिरस्थावरता झाली. ३. वाघाचे बंड व बापू गोखल्याचा पराक्रम, धोंडी वाघ हा पहिल्याने पटवर्धन व करवीरकर यांच्या सैन्यांत नौकर होता. पुढे ही नौकरी सोडून तो हैदरच्या सैन्यांत नौकरीस राहिला व हळुहळु मोठ्या साहसाने व शौर्याने योग्यतेस चढला. जेव्हां मराठे व इंग्रज यांनी टिपूवर मौहीम केली, त्या वेळी वाघाने टिपूची नौकरी सोडली व धारवाडच्या आसपास लुटारूपणा सुरू केला. पेशव्यांनी धोंडोपंत गोखले यांची शके १७१६ त त्यावर रवानगी केली. गोखल्यांनी त्याचा मोड करून त्यास टिपूच्या राज्यांत हुसकावून दिले. त्या वेळी त्या भयंकर वाघाने धोंडोपंताच्या रक्ताने मिशा लाल करण्याची घोर प्रतिज्ञा केली. टिपूच्या राज्यांत आल्यावर टिपूने त्याची सुंता करून त्यास मुसलमान केले आणि मोठ्या अधिकारावर नेमले. पुढे कांही दिवसांनी तो टिपूचे हि ऐकेनासा झाला. तेव्हां त्यास पकडून श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यांत कैदेत ठेविलें. टिपूचे सर्व राज्य इंग्रजांनी काबीज केल्यावर पट्टणच्या किल्लयांतील सर्व बंदिवान सोडले, त्यांत वाघ हि सुटला. सुटका होतांच त्याने सात आठ हजार शिपाई जर्मवून फिरून इंग्रजांचे मुलखांत गडबड माजविली. तेव्हां वेलस्लीने पेशव्यांजवळ त्याला पकडण्यासाठी मदत मागितली. पेशव्यांनी शके १७२२ च्या आषाढ महिन्यांत धोडोपंत गोखले याजबरोबर सैन्य देऊन त्यास इंग्रजांच्या मदतीस पाठविले. धोंडोपंत व त्यांचे पुतणे आप्पासाहेब हे वाघाच्या तोंडावर गेले असतां वाघाने त्यांना एका झाडींत कोंडले. या गर्द झाडींत धोंडोपंत आपला घोडा वाघांच्या अंगावर घालीत असतां, मध्ये एका झाडाच्या फांदीचा त्यांचे मस्तकास तडाखा बसून ते घोड्यावरून खाली पडून बेशुद्ध झाले. इतक्यांत वाघानें अचानक येऊन तेथे त्यांचा वध केला व त्यांच्या रक्ताने आपल्या मिशा रंगविल्या. हे भयंकर कृत्य झाल्याचे ऐकून सेनानी बाप