पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ पानसे घराण्याचा इतिहास. पटवर्धन, उजव्या बाजूस शिंदे व विंचूरकर यांची पथकें व वेळोवेळी पुढील फौजेस कुमकं करण्याकरितां सर्वांच्या पिछाडस स्वतः अप्पा, या प्रमाणे रचना करून त्यांनी शत्रूच्या गोटावर हल्ला केला. तोफखान्यांतील पुढील तीन मोठ्या तोफा पहिल्याने सुरू केल्या. त्यांचा मारा होतांच करवीरकरांची फौज उधळली व किल्लयाच्या आश्रयास पळाली नंतर आप्पांनी कोल्हापुराकडे रोख फिरवून टेंबळाईवर येऊन मुक्काम केला. राजधानीवर आलेले संकट पाहून कोल्हापूरकरांची फौज पन्हाळ्याहून परत कोल्हापुरास आली. दुस-याच दिवशी लढाई होऊन कोल्हापूरकरांचा पराभव झाला. या पराभवामुळे कोल्हापूरकर महाराज पन्हाळ्यास रहावयास गेले. त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी पहाटे पेशव्यांच्या फौजेने पन्हाळ्याच्या माचीवर अकस्मात् हल्ला केला, व त्यांत महाराजांच्या तोफा काबीज करून त्याच तोफा त्यांच्या सैन्यावर रोखून मारा सुरू केला. तेव्हां महाराज व सारी फौज, पळून गडामध्ये घुसली. या धांदलीत वरीच मंडळी पेशव्यांकडील सैन्याचे हाती लागली. त्यांत महाराजांचा आवडता सरदार विश्वासराव गाईकवाड हा हि सांपडला. त्याला पाहताच आप्पांचा वेष अनावर होऊन त्यांनी त्यास ठार मारले व अशा रीतीनें परशुरामभाऊचा अधमपणाने खून करणारास पुरें प्रायश्चित्त दिले. यानंतर कोल्हापुरावर मोर्चे लागू केले. बाहेरून शहरास मजबूत कोट असल्या कारणानें तो पडल्याशिवाय हल्लयांचे काम यशस्वी होणार नाहीं हे जाणून पानशांनी आपल्या दोन * दिवाल तोडी ' तोफा मार्याचे डावे बाजूस उभ्या करून त्यांचा भयंकर मारा सुरू केला. प्रथम ब्रह्मपुरीतील इमारती पाडून अडचणी नाहीशा केल्यावर तीन चारशें हात लांबचा तट पाडून तो जमीनदोस्त केला. व सर्व तोफा पुढे सरकवत अगदी तटाजवळ दोन अडीचशें हातांचे अंतरावर नेऊन भिडविल्या. या योगाने शहरावर तोफांचा मारा अचुक होऊ लागला. या असह्य माच्यामुळे व शत्रुसैन्यांस बाहेर पडण्यास दुसरी वाट नसल्यामुळे, त्याची अगदी गाळण उडून गेली. (शके १७२१ फाल्गुन शुद्ध चतुर्दशी. ) याच वेळीं नाना फडणीस यांचा देहांत झाल्याची बातमी येऊन थडकली. यामुळे सर्वांस अतोनात दुःख झाले. या अनिष्ट प्रकारामुळे वेढ्याचे काम ढिलाईने चालले. या वेढ्याचे काम फार जोखमीचे असल्याने पानशांनी “ सवाई लक्ष्मण " नांवाची तोफ, या ठिकाणच्या माध्यास योग्य अशी, नवीन कविली. ती गणपतराव स्वतः च डागीत असत. या सुमारास रामचंद्र आप्पांनी मिरजेस बाळासाहेब पटवर्धनांना एक पत्र लिहिलेले उपलब्ध झाले आहे, त्यांत ह्या तोफेचा मजकूर आला आहे. ते म्हणतात ४६ तोफेचे गाडे तयार होण्याचा मजकूर लिहिला, त्यास गाड्याचे उपयोगी समयास थोर लाकूड मिळत नाहीं व लोखंड हि तसेच " या करितां “ अस्मान तडाख्याचे ( या नांवाची एक प्रचंड तोफ होती ) सामान सवाई ( लक्ष्मण ) तोफेस लावून, तेच लौकर तयार करण्याविषयी आज्ञा पाहिजे. गोळ्यांचे फर्म्याचा व पानसे यांच्या पत्रांचा