पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवे. १०१ कीं, नाना देतात ती रक्कम घेऊन त्यांच्या हवाली आपल्याला करू किंवा सर्जेरावाचे मार्फत ठरल्याप्रमाणे मला दोन कोट रुपये आपण देतां ? तसे देत असाल तर नानांचे ‘पारिपत्य मी करतो. तेव्हां श्रीमंतांनी दुसरी गोष्ट कबूल केली. नानांना उघड उघड कैद करणे शिंद्यांना अशक्य होते; सबब यांनी साठ लक्ष रुपये द्यावे असा नानाकडे तगादा लावला. नानांनी सांगितले की, गंगापार झाल्यानंतर तुम्हांस रक्कम देईन. परंतु ती पुण्यास च देण्याबद्दल शिंद्यांनीं हट्ट धरिला व प्रकरण हातघाईवर आणले. * शेवटीं दौलतरावाने आपल्या पदरचा एक फ्रेंच सेनापति मायकेल फिलोज ( * मुकीर” ) यांस मध्यस्थी करण्याचे मिषाने नानाकडे पाठविले. नानांनी व त्यांनी ' मिळून कराराच्या याद्या केल्या व शिंदे स्वतः नानास भेटून त्या त्यांनी मान्य केल्या. आतां दिलजमाई झाल्याने नाना हे परत भेटीसाठी शिंद्याचे गोटांत गेले, व तेथे दौलतरावांशी बोलत असतां, पूर्वी ठरविल्याप्रमाणे, त्या युरोपियन मुकीराने ( शके १७१९ पौषांत ) एकदम येऊन नानास कैद केले. नाना कैद झाल्यानंतर पुण्यास सर्वत्र बेबंदशाही सुरू झाली. २. पुण्यांत सर्जेरावी. | श्रीमंतांनी शिंद्यास दोन कोट रुपये कबूल केले होते, पण तेवढी रकम त्यांच्याजवळ नव्हती म्हणून सर्जेरावास नानांच्या मर्जीतील पुण्यांत राहणाच्या लोकांकडून ती वसूल करण्यास परवानगी दिली. प्रथम त्याने नानांच्या पक्षाच्या, बाबा फडके, परचुरे, काळे, पिंगळे, चक्रदेव वगैरे मंडळींना कामानिमित्त सरकारवाड्यांत बोलावून आणून कैद केलें; आणि त्यांच्या घरांच्या जप्त्या करून अतोनात पैसा उकळला. तसे च इतर प्रतिष्ठित व सावकार लोकांना हि छळून त्याने त्यांच्या घरांस खणत्या लावून पैसा वसूल केला. या च गडबडीत दौलतरावाचे व बायजाबाईचे लग्न झाले. यानंतर सर्जेराव हा खास नानांच्या वाड्यांत च रहावयास आला व तेथे तो गांवांतील लोकांस आणून छळू लागला. याप्रमाणें कहर चालू असतां शके १७२० वैशाख शुद्ध द्वितीया बुधवारी प्रातःकाळीं तोफखान्याकडील सखारामपंत पानसे यांचे चिरंजीव यशवंतराव हे सरकारें वाड्यांत घोड्यावरून येत होते, त्यांस सर्जेराव घाटग्याचा सरदार नेवासकर देशमूख यांनी घोड्याखाली उतरावयास लावून नानाचे वाड्यांत चौकत आणून बसविले आणि त्यांचा घोडा पळवून नेला. हे वर्तमान सखारामपंतास समजले. त्यावरून त्यांनी तीन चार तोफा व बाणदार तयार करून नेवासकराचे पारिपत्य करावे या विचाराने बुधवार चावडी पावेतों ते आले. ही बातमी श्रीमंतास समजताच त्यांनी “ तुमचा मुलगा सोडवून आणवितों, तुम्ही माघारें जाणे " असे सांगून पाठविले, त्यावरून ते माघारे गेले. मग श्रीमंतांनी आवा काळे