पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० पानसे घराण्याचा इतिहास. शुद्ध प्रतिपदेस त्यांत देवाची स्थापना केली. स्थापनेच्या बंदोबस्तासाठी नाना फडणीस यांचे कांहीं अरब व पेशवे सरकारची दोन पलटणे आली होती. त्यांच्यांत क्षुल्लक कारणावरून तंटा सुरू झाला आणि अखेर त्याचे पर्यवसान गोळीबारापर्यंत होऊन कांहीं माणसे मेली. गद्रे यांनी नानांच्या घरी जाऊन त्यांच्या कानावर ही हकीकत घातली. तेव्हां नानांनी दंगा मोडण्यासाठी आपला चोपदार प्रथम पाठविला, तो त्या गर्दीत जखमी झाला. मग हत्यारबंद अरबांची एक तुकडी पाठविली. ती तुकडीं पोचण्यापूर्वीच गणपतराव पानसे यांना खबर लागल्यावरून ते तेथे गेले होते. लगेच त्यांनी दंगा मोडिला. या भानगडीत गणपतराव पानसे यांच्या आवडत्या * श्यामसुंदर " नांवाच्या घोड्यास गोळी लागली व त्यामुळे तो तीन पायांवर उभा राहिला. तो घोडा पुढे निकामी झाल्यामुळे गोळी घालून त्यास ठार केले. वरील देवतेच्या स्थापनेचे वेळीं खून पडल्यामुळे या मुरलीधरास * खुन्या मुरलीधर " असे नांव, मिळालें व ते अद्यापपर्यंत चालू आहे.' | श्री. रावबाजी हे क्षणिकचित्त असल्याने व त्यांचा कोणावर हि भरंवसा नसल्याने त्यांनी आपली गादी स्थिर होण्यासाठी वाटेल त्या माणसाशी वाटेल तसे उघड किंवा गुप्त करार केले होते. वास्तविक नाना फडणीसांनी त्यांना गादीवर आणले होते, पण, त्यांच्यावर हि श्रीमंतांचा विश्वास नव्हता. नानांची त्यांना विनाकारण भीति वाटत असे, आणि त्यामुळे त्यांनी नानांच्या विरुद्ध दौलतराव शिंद्यांशीं एक गुप्त करार केला होता. नाना हे रावबाजी यांना गादीवर बसविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते, तर त्याच वेळी दुसरीकडे त्यांना फसवून गोत्यांत आणण्यासाठी रावबाजी एक जाळे विणीत होते. या जाळ्यांत एकटे नानाच सांपडले नाहीत, तर मराठी साम्राज्य हि सांपडले. हे जाळे असे होतेः–फितुरीमुळे कुप्रसिद्धीस आलेला कागलचा सर्जेराव घाटगे त्याची मुलगी बायजाबाई ही फार देखणी व सुंदर असल्यामुळे दौलतरावाच्या मनांतून तिच्याशी लग्न लावावयाचे होते. पण शिंद्यांची जातकुळी कमी असल्याने आपण त्यांना मुलगी देणार नाही असे सर्जेराव म्हणत असे. हे त्याचे म्हणणे बाह्यात्कारी असे व आंतून अशी इच्छा होती की, स्वतःस पुष्कळ दौलत व अधिकार मिळाल्यास शिंद्यास मुलगी द्यावयाची. हा त्याचा मनोदय श्री. रावबाजी यांना माहीतै होता, त्यामुळे त्यांनी गुप्तपणे सर्जेरावाशी करार केला की, सर्जेरावांनीं शिंद्यासु मुलगी द्यावी व तसे त्याने केल्यावर श्रीमंतांनी शिंद्यांची दिवाणागिरी सर्जेरावास द्यावी व सर्जेरावांनीं त्याबद्दल दोन कोट रुपये शिंद्यास द्यावे. या मध्यस्थांबद्दल शिंद्यांनी श्रीमंतास गादीवर बसविण्याविषयीं नानांस मदत करावी. पुढे, श्रीमंत रावबाजी गादीवर आले. यापूर्वी महाडास असतां नानांनी दौलत-- रावाशी असा करार केला होता की, श्रीमंतांना गादीवर बसविण्यासाठी नानास मदत करावी व त्याबद्दल नानांनी एक कोट रुपये शिंद्यास द्यावे. शिंद्यांनी श्रीमंतास विचारले