पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. ९ फौजेच्या तत्कालीन सरदार मंडळींत हि गणपतराव, सखारामपंत, पुरुषोत्तमराव व रंगराव यांची नांवें आढळतात. | पुरुषोत्तमराव हे हमेश पुणे मुक्कामी राहून मोहिमेवरील सरदारांस तोफखान्याकडील सरंजाम रवाना करणे, हुजूर श्रीमंताजवळ राहणे, त्यांची सल्लामसलत घेणे, तोफखान्यासंबंधी हिशेब ठेवणे वगैरे कामे करीत असते. यामुळे यांचे नांव कोणत्याहि मोहिमेंत आलें नाहीं. याखेरीज पेशव्यांचे खास सेनेत दहा हजार घोड्यावर हे पागनीस होते. यांस पुत्रसंतति नव्हती म्हणून जयवंतरावाचे कनिष्ठ चिरंजीव रंगराव यांस त्यांनी दत्तक घेतले होते. . रंगराव हे हि पुण्यास राहून वडिलांस मदत करीत असत. हत्तीवर बसण्याची कला यांना पूर्णपणे अवगत होती. हल्ली हत्तीवर हौदा अगर अंबारी घालून मिरवणुकीत फिरणारे महात आहेत; परंतु लढाईत हत्तींचा उपयोग कसा करावा हे त्यांस माहीत नाही. आपल्या हिंदुस्थानांत अत्यंत प्राचीन काळापासून लढाईत हत्तींचा उपयोग करीत असत. चतुरंग दळांत गज-दळ हे अवश्य असे. व ती परंपरा स्वराज्य नष्ट होईपर्यंत -अविछिन्न चालू होती. हातघाईच्या लढाईत हत्तींच्या सोंडेत लांब लांब चारपासून आठपर्यंत पट्टे अगर सांखळ्या देत, व त्याला शत्रु-सेनेच्या गर्दीत घुसवीत. मग तो आपली सोंड जलद ( पट्याच्या हातांनी ) फिरवून सपासप शत्रुसेनेचा धुव्वा उडवी. अशा वेळी त्याचजवळ जाणे फार धोक्याचे असे. त्यांत त्याला दारु पाजून धुंद करीत. अशा त-हेने हत्तीवर बसून शत्रु-सेनेत घुसण्याचे शिक्षण रंगराव यांनी घेतले होते. शके १६९१ साली पेशवे सरकारच्या पदरी अशा त-हेने शिक्षण घेतलेले जे वीस महात होते, त्यांत रंगराव यांचे नांव आढळते. - सखारामपंत पानसे शके १७१८ चे सुरुवातीस वारले; म्हणून त्यांचे चिरंजीव यशवंतराव व पुतणे गणपतराव यांच्या नांवें फौजेचा सरंजाम पेशवे यांनी निम्मेनिम करून त्यांची सनदा-पत्रे शके १७१८ ज्येष्ठ शुद्ध सप्तमीस करून दिली. तोफ-खान्याची मुख्य सरदारी गणपतराव यांचे नांवें होती. यशवंतराव यांचेकडे १३४४० रु. चा जात-सरंजाम होता, तो त्यांचेकडे शके १७४० पर्यंत चालला. पुढे कंपनी सरकारानें तो अकरा हजारांचा केला; तो शके १७४८ पर्यंत चालू राहिला. यशवंतराव यांस संतति न झाल्यामुळे त्यांची पत्नी यमुनाबाई यांनी वामनराव नांवाचा मुलगा दत्तक घेतला. वामनराव यांना हा सरंजाम मिळाला नाही. नुसती इनाम-वृत्ति तेवढी त्यांच्याकडे ठेविली. पुढे वामनरावांनी पूर्वीचा सरंजाम चालविण्याबद्दल सरकारदरबारी बरीच खटपट केली, परंतु तिचा कांहीं उपयोग झाला नाही. । - पुणे येथील खुन्या मुरलीधराचे देऊळ प्रसिद्ध आहे. मुरलीधराची मूर्ति अतिशय सुंदरं आहे. ती त्या वेळचा विख्यात मूर्तिकार बखतराम याने घडलेली आहे. हे देऊळ तत्कालीन पुण्यातील प्रसिद्ध सावकार दादा गद्रे यांनी बांधून शके १७१९ चैत्र