पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें, = ==== १. श्रीमंत रावबाजी यांस पेशवेपद व नानांस अटक. श्रीमंत रावबाजी हे गादीवर बसण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी करू लागले. घटकेंत नाना फडणीस यांना आपला हेतु पूर्ण करण्याची विनंति करावी, घटकेत दौलतराव शिंद्याला हात धरून नानांच्या विरुद्ध जावे, अशा गोष्टी ते करू लागले. या सुमारास शिंद्याच्या फौजेत व दरबारांत शेणव्यांचे प्रस्थ बहुत माजले होते. नानांच्या हातचा कारभार काढून घेऊन त्यांना कैदेत ठेवावे व आपण पेशव्यांचे कारभारी व्हावे असा मनसुबा त्यांनी चिला. आपल्याला पकडण्याचे ठरले आहे हे पाहून नानांनी पुण्याहून साताच्याकडे प्रयाण केले. यानंतर शिंद्यांनी श्रीमंताजवळ, आपल्या मदतीने ते गादीवर आले म्हणून पूर्वी ठरल्याप्रमाणे सव्वा कोट रुपयांची मागणी केली. तेव्हां श्रीमंताचे डोळे उघडले. नंतर साता-यास जाऊन पेशवाईची वस्त्रे घेण्याची राहिली होती, त्यासाठी श्रीमंत पुण्याहून निघाले. वाटेत अनेक खटपटी व कलागती शिंद्याने केल्या. त्या गडबडीत परशुराम भाऊ हे नानांच्या विरुद्ध जाऊन शिंद्यांच्या शेणव्यास मिळाले. या एकंदर उलाढालींचे अखेर पर्यवसान श्रीमंत रावबाजी यांना प्रतिबंधांत ठेवून पेशवाईच्या गादीवर श्री. धाकटे चिमाजी आप्पा यांना बसविण्यांत झाले. श्री. चिमाजी अप्पा यांचे दत्तविधान श्री. मातोश्री यशोदाबाईसाहेब यांच्या मांडीवर शके १७१२ च्या वैशाखाच्या सुमारास झाले. या कारस्थानांत पानसे मंडळी कोणाच्या बाजूस होती ते नक्की समजत नाही. पण, दत्तविधानाच्या नंतर सरदार मंडळींनी जे आहेर केले, त्या वेळीं पानशांचें नांव आलेले आहे. त्या वेळी माधव कृष्ण यांनी २२५॥ रुपयांचा व सखाराम यशवंत यांनी २१६। रुपयांचा अहेर केला होता. | नाना कारभारांतून काढले गेले. नंतर त्यांनी इंग्रज, भोंसले व निझाम यांना आपल्या बाजूला मिळविले. एवढेच नव्हे तर खास दौलतराव शिंद्यास फोडून त्यांच्या शेणवी कारभा-यास ( बाळोबा पागणीस ) त्यांनीं कैद करविले. व मग त्यांना अनुकूल असलेल्या परशुरामभाऊस हि त्यांनीं पकडविलें ( आश्विन शके १७१८ ). ही नानांची मुत्सद्देगिरीची मसलत मोठी वाखाणण्याजोगी होती. यानंतर नानांनी रावबाजी यांना गादीवर बसविले आणि पूर्ववत् आपल्या हाती कारभार घेतला. ज्या दिवशी श्रीमंत गादीवर बसले त्या दिवशीं तोफखान्याचे दरोग्यास हुकूम झाला होता की, “ सवाईराव साहेब पुरंदराहून पुण्यास रहावयास आले त्या वेळी तोफांचे जितके बार केले असतील तितके आजच्या प्रसंगी करावे " या हुकुमावरून दरोग्याने साठ बार केले. या सुमारास सरकारी तोफखान्याचे अधिकारी पानसे मंडळी पुढील प्रमाणे होती; माधवराव कृष्ण, जयवंतराव, सखारामपंत व गणपतराव विश्वनाथराव, सरंजामी