पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. ९७ या मोहिमेत पानशांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पुढे पेशवे सरकारांनी हिंगणी मुकाम त्यांना पूर्वीची तैनात वाढवून एक नवीन तैनात-जाबता करून दिला. या वेळी सरकारच्या तोफखान्याची मुख्य सरदारकी माधवराव कृष्ण यांच्या नांवाने होती. त्यांच्या भाऊबंदांना तोफखान्यांत निरनिराळे अधिकार देऊन त्यासाठी निरनिराळ्या तैनाती दिल्या होत्या. तोफखान्याच्या खर्चाबद्दल दोन लक्ष, व फौजेच्या सरंजामाबद्दल तीन लक्ष अशी नेमणूक असून शिवाय चौघड्याचा व मल्हारगड ह्या किल्लयाचा सरंजाम पृथक् होता. • वर सांगितले च आहे की, खड्ची लढाई म्हणजे मराठी साम्राज्यदिवाकराचा मध्याह्न काळ होय. त्या लढाईनंतर या सूर्यास उतरती कळा लागली. या उतरत्या काळांतील एक जबरदस्त धक्का बसणारी गोष्ट म्हणजे श्रीमंत सवाई माधवरावसाहेब पेशवे यांचा शोचनीय अंत ही होय. या हि धक्कयांतून साम्राज्य तगवून धरण्यासाठी पटवर्धन, नाना, पानसे, वगैरे मुत्सद्दी व वीर पुरुष यांनी पराकाष्ठेचे श्रम केले, पण रावबाजीसारखे अनिश्चित बुद्धीचे मालक गादीवर कायम झाले आणि पूर्वीचे जुने खामिभक्त सरदार, मुत्सद्दी नाहीसे झाले त्यामुळे नानांचे त्या वेळचे श्रम फुकट गेले. पुढे कांही दिवसांनी नानांनीही स्वर्गवास केला आणि एका इंग्रजाने म्हटल्याप्रमाणे * मराठी साम्राज्यांतील शहाणपण लयास जाऊन " तेथे परक्यांना हात शिरकविण्यास सुसंधि लाभली; असो. । । ਸਿੰਘ ਆਮ ਸਨ। | -१००० ।