पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ प्रकरण सहावे. हे दोघे हि अकस्मात् कालवश झाले. त्यामुळे निझामाला अस्मान् ठेंगणे झाले. पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे यांनी आपल्या सरकारच्या बाकीची मागणी केली असतां मशीरने त्यांना सांगितले की, नानांनी स्वतः येथे येऊन आम्हास हिशेब समजावून द्यावे. याच वेळी निझामाच्या दरबारांत, काळे यांचे समक्ष, पेशवे व नाना यांचीं सोंगे आणवून निझामाने त्यांचा अपमान केला व पेशव्यांचे राज्य घेऊन त्यांना काशीस स्नानसंध्या करण्याकरितां पाठवू असे तो म्हणाला. अर्थात् इतक्या निकरावर गोष्टी आल्यानंतर, पेशव्यांना त्याच्यावर मोहिम करणे अपरिहार्य झाले. निझामाजवळ यावेळी मुसा रेणु वैगरे फ्रेंचांच्या हातांखालीं शिक्षण घेतलेली तेवीस पलटणे होती; शिवाय त्याचा तोफखाना हि जय्यत तयार होता. सर्व मिळून त्याची फौज एकलक्ष दहा हजार होती. साठ सहस्र पठाण बुंदी, तीन शें तोफा थोर अखंडी " असा त्याचा निव्वळ स्वतःचा सरंजाम होता. इकडे पेशवे सरकारांनी हि आपली जय्यत तयारी चालविली. दौलतराव शिंदे पुण्यास होते, त्यांची फौज हिंदुस्थानांतून आणविण्यांत आली. नागपूरकर भोंसले, होळकर, रास्ते, पटवर्धन, विंचूरकर, घोरपडे, निंबाळकर, प्रतिनिधि यांना व दुस-या अनेक सरदारांना बोलावून घेतले. निझामाप्रमाणे पेशवे यांनी वॉइड नांवाच्या एका इंग्रजाच्या हातांखाली ** इंग्रजी पलटणे सजून तयार केली होती, ती हि तयार झाली. श्रीमंतांनी एकंदर फौजेपैकी कांहीं जमातींच्या कवाईती पाहिल्या' या कवाईतींत शिंद्यांचे * पांच हजार गाडद व आठ तोफा होत्या शके १७१६ कार्तिक वद्य द्वादशीस हुजुरातचे मुख्य सरदार बावा फडके डेरे दाखल झाले व तिकडे निझाम हि बेदराहून निघून त्याच्या आधीच डेरे दाखल झाला होता. श्रीमंत सवाईरावसाहेब हे खासा या मोहिमेवर नाना फडणीस यांच्यासह निघाले होते. अघाडीस सरकारी तोफखाना घेऊन गणपतराव विश्वासराव, माधवराव कृष्ण व सखाराम यशवंत पानसे हे या फौजेत होते. या तोफखान्यांत २१२ तोफा होत्या. अशा थाटाचा जो “ दिला विनीवर तोफखाना ' ( शाळिग्राम पेवाड पृ. १४२ ) असा तोफखाना बाळगणा-या “ पानशांची बहु मर्यादा" (शिस्त) होती. सखारामपंताबद्दल बाळा लक्ष्मण शाहीर म्हणतो की, “सखाराम पानसे भले हैत झंझणार, बारा कोस लांबी रुंदी ज्या फौजेचे तळ पडती'. इतकी फौज प्रचंड होती. गारपीर, वडगांव, थेऊर यांवरून ही फौज नगराकडे वळली. निझाम हि तिकडून पुरंड्यास आला. वाटेत जोगाईचे अंबे या क्षेत्राचा त्याने विध्वंस केला. त्याचा रोख पाहून श्रीमंतांनीं सीना नदी गांठली. धानोरे येथून बाबा फडके यांना ६०-७० हजार फौजेनिशीं अघाडीस पाठविले. या वेळी निझाम हि फडक्यांच्या सैन्यापासून पंचवीस कोसावर येऊन पोहोचला होता. निझामाने यावेळी श्रीमंतांकडे तहाचे बोलणे चालविले; परंतु श्रीमंतांनीं मशीर यास कैदेत ठेवून आमच्या सल्याने कारभार चालवावा अशी अट घातली, ती त्याला कबूल होईना. या अटी नाकारून तो पुढे चाल