पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. मराठी साम्राज्याचे जे वैभव दृग्गोचर झाले ते अखेरचे च होय. त्यानंतर तसा विज-: याचा व अभिमानास्पद प्रसंग आला नाही. हा काळ म्हणजे शिवशाहीचा मध्यान्हीचा काळ होय. त्याच्यापुढे मराठ्यांच्या स्वराज्यसूर्यास उतरती कळा लागली. अर्थात् स्वराज्यावरोवर च स्वराज्यनिष्ठ सरदारांचे हि दिवस उलटण्यास प्रारंभ झाला. त्यास अनुसरून पानसे घराण्याला हि पडता काळ आला. त्यामुळे, या एकंदर कारणांसाठी या शेवटच्या पण महत्त्वाच्या मोहिमेच्या वृत्तांताचा थोडासा विस्तार येथे करण्याचे योजले आहे. | या प्रसंगी दक्षिणेत मराठे व निझाम यांच्यांत सलोखा नांदण्यापेक्षा त्यांच्यांत बिघाड माजलेला असणे हे जास्त स्वाभाविक होते. कारण, श्री. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी व्यवस्था केल्याप्रमाणे निझामाच्या ( किंवा एकंदर मोंगलाई ) राज्यांतून चौथ व सरदेशमुखीचा वसूल साल दरसाल मराठ्यांनी घ्यावयाचा होता. पण निझामाला हे आपल्यावर लादलेले ओझे कसे तरी करून झुगारून द्यावयाचे होते. पेशवाईच्या स्थापनेपासून श्री. थोरले माधवरावसाहेब पेशवे यांच्या राजवटीच्या अखेरीपर्यंत मराठे व निझाम यांच्यांत जी जी युद्धे झाली त्या युद्धांना मुख्यतः हे च कारण असे. श्री. नारायणराव साहेवांच्या वधानंतर मराठी राज्यांत जी दुफळी झाली, ती निझामाच्या पथ्यावर पडली. पुणे दरबारला त्या वेळी श्री. राघोबादादा यांच्यांशी व त्यांची बाजू घेऊन आलेल्या इंग्रजांशी सतत तोंड द्यावे लागत असल्यामुळे, यांस इकडे निझामाशी मैत्री ठेवणे भाग पाडले. आपल्या दरएक कामगिरीस सहाय्य मिळावे यासाठी पुणे दरबाराने निझामास तीस लक्ष रुपये उत्पन्नाची जहागीर व लताबादचा किल्ला दिला. तथापि, पेशव्यांना, निझाम जी मदत करी, ती मनापासून करीत नसे च. यावेळी उत्तर हिंदुस्थानांत महादजी शिंदे यांनी दिल्लीचा पातशहा आपल्या ताब्यांत घेऊन त्याच्या राज्यावर एक प्रकारे पुणे दरबारची देखरेख कायम केली व बादशहाचा प्रतिनिधि म्हणून महादजी महाराष्ट्रांत मिरवू लागले. बीड परगण्याची मागणा बादशहाच्या नांवाने या वेळी पाटिलवावांनी निझामाजवळ केली, ती त्याने नाकारली; यामुळे पाटिलबोवास फार राग आला. पेशवे सरकारची हि बाकी निझामाकडे आतां दोन कोटी वर होऊन गेली होती, ती हि तो देईना. सारांश या कारणामुळे मराठ्यांना निझामावर मोहिम करणे भाग पडले. या वेळी प्रथम निझामाचा दिवाण मशीर उल्मुल्क याने निझामास सल्ला दिला कीं, मराठे सांप्रत, तीस लक्ष रुपये उत्पन्नाचा प्रांत मागत आहेत, तर तो त्यांस देऊन भांडण मिटविण्यापेक्षां, त्या रकमेत च सैन्य उभारून मराठ्यांशी लढाई करावी हे जास्त बरे. हे म्हणणे निझामास स्वाभाविक पसंत पडले व त्याप्रमाणे त्याने युद्धाची तयारी चालविली. इतक्यांत त्याच्या सुदैवाने महादजी शिंदे व हरिपंत तात्या फडके