पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ पानसे घराण्याचा इतिहास. करून खड़े गांवच्या किल्लया नजीक खैरा नदीवर येऊन उतरला. तेव्हां, त्याला अडविण्यासाठी शिंदे व होळकर हे पुढे गेले, आणि त्यांच्या मदतीस श्रीमंतांनी परशुरामभाऊ पटवर्धन यांस सेनापति नेमून बरोबर “ तो कखाना “ झाडून देऊन पाठविले. तोफखान्या बरोबर या वेळी सखारामपंत पानसे हे होते, ते फाल्गुन वद्य द्वितीयेस घोडे गांवास आले. निझाम त्यांच्यापासून दीड कोसावर होता. संध्याकाळी निझामाने त्यांच्यावर हल्ला केला. या वेळी सखारामपंत पानसे यांनी तोफांचा मारा केल्यामुळे निझाम माघारा फिरला. याच वेळी भासल्यांनी सपाटून बाणांचा वर्षाव केल्यामुळे असदअल्ली मागे हटला व मुसा रेमूच्या मदतीस जाऊ लागला, ही संधि साधून गणपतराव पानशांनी त्याजवर एक तोफांची फैर झाडली, त्या मुळे असदअल्लीच्या फौजेची दाणादाण झाली, मागून रेमूची फौज व इतर मोंगल फौज यांची हि तीच अवस्था झाली. इतक्यांत संध्याकाळ होऊन अंधार पडला. दिवसभर शत्रुसैन्याशी निकराने सामना देण्याचे काम पडल्यामुळे, पेशव्यांकडील सैन्यास संबंध दिवसांत अन्न पाणी मिळाले नाहीं. रात्रीं सर्व तळावर सामसूम झाल्यावर मराठ्यांचे सैन्यांतील कांही लोक तृषाक्रांत झाले, सबब पाण्याचा तपास काढण्यास तळाबाहेर निघाले. रात्र अंधेरी असल्यामुळे चुकाने हे लोक निझामाचे गोटांत शिरले. निझामाचे सैन्यांतील लोकांस हा आकास्मत छापा आल्याचा भास होऊन दोन्ही सैन्यांमध्ये धुमश्चक्री माजली. बंदुकीचे बार व गलबला ऐकल्या बरोबर दोन्ही सैन्यांतील लोक उठून गोळा गोळा सुरू झाली. आपण कोणत्या पक्षांतील लोकांस मारतें हैं हि एकमेकांस समजेना. पुढे चंद्रोदय झाल्यावर पानशांनी आपल्या तोफा शत्रु सैन्यावर रोखून शेंकडों लोक मारिले. या वेळी दोन्ही पक्षाकडील कांहीं नामांकित सरदार ठार झाले. निझान घाबरा होऊन खर्चाच्या गढीत आश्रयास गेला, व त्याच्या सैन्यांनी तोफखाना तळावरच टाकून पलायन केले. या सर्व तोफा दुसरे दिवशी पानशांच्या हाती लागल्या. निझाम गढ़ींत शिरल्यावर पेशव्यांचे संन्यांनी गढीस वेडा घातला व त्यामुळे आंताल सैन्यांस रसद मिळेनाशी झाली. खुद्द निझामास हि पाणी प्यावयास मिळेना. पाणी बारा रुपयांस एक पखाल व एक रुपयास अच्छर दाणा, या प्रमाणे तळावर महागाई झाली. अशा स्थितीत हि गढीवर तोफांचा मारा सुरू होताच. इतकी हलाखी झाल्यावर पेशवे सरकारांनी सांगितलेल्या अटी निझामाने मान्य करून तह केला; व अपमान करणाच्या मशीरास पेशव्यांच्या ताब्यात दिले. विजयश्रीने माळ घातल्यानंतर सवाईरावसाहेब मोठ्या विजयानंदाने परत फिरून पुण्यास दाखल झाले. या लढाईत शिंद्याकडील व सरकारच्या ( पानशांच्या दिमतीतील ) तोफखान्याने महत्त्वाची कामगिरी केल्याचे इतिहासांत नमूद आहे. एक पोवाडकार म्हणतो कीं * पानशावर रावसाहेबांची ( पेशव्यांची ) * रीझ” ( मर्जी ) होती. खडर्याची मोठी लढाई फाल्गुन वद्य पंचमीस झाली.