पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. ९३ नाहीं. मग खास पंतसाचवांना धरावे किंवा साधल्यास मारून टाकावे असा बेत करून बाजीरावाने हिवरेकर यास पांच हजार रुपये व त्याचे जमातदार व कारकून यांना सोन्याची कडीं वगैरे बक्षिसे देऊ केली आणि त्यांस आपल्या दुष्ट मसलतीत सामील करून घेतले. मग शामरावांचे लोक बरोबर घेऊन बाजीराव जेजुरीस अचानक गेला । व पंतसचिव सोंवळ्याने देवतार्चन करीत असतां त्यांच्यावर त्याने छापा घातला. पंतांजवळ त्यावेळी सारे दहा बारा माणूस होते. प्रथम गारद्यांनी खासा स्वारी साचव यांच्यावर पांच सात गोळ्या घातल्या; पण, सुदैवाने त्यांना एक हि लागली नाहीं. मग ते गारदी जवळ येऊन पंतांना धरू लागले, तेव्हां, पंतांनी व त्यांच्या लोकांनी गारद्यांशी मोठ्या शौर्याने दोन हात केले. त्या प्रसंगी सचिवाकडील पांच दहा शिपाई व कांहीं ब्राह्मण मारले गेले, त्यांच्या पूजेच्या मूर्ति भ्रष्ट झाल्या व खुद्द पंतांना तरवारांच्या दोन जखमा झाल्या. त्यांच्या पत्नीस ( ही प्रख्यात सखारामपंत बापू बोकील यांची कन्या ) हि जखमा झाल्या. याप्रमाणे झाल्यावर पंतांना पकडून एक वस्त्रानिशी बाजीरावाने जेजुरी येथे कैदेत ठेविले व त्यांची सर्व मालमत्ता लुटून घेतली. दुसरे दिवशी हे वर्तमान पुण्यास महादजी शिंदे यांस कळले. या वेळी नानांचा कांहीं तरी दोष काढावा व तो श्रीमंतांना दाखवून त्यांची मर्जी नानांवर खप्पा करवून कारभारीपणा आपल्याकडे घ्यावा अशी पाटीलबावांच्या अंतर्यामी जबरदस्त इच्छा होती. तेव्हां, ही आयतीच संधि आल्यावर, ते ती फुकट कशी घालविणार ? वरील बातमी समजतांच पाटीलवावांनीं भर कचेरीत ( सरकार वाड्यांत ) जाऊन नानांची बहुत निर्भत्र्सना केली व श्रीमंतांना विनंति केली की, “ असे होणे फार वाईट, याचा बंदोबस्त स्वामींनी करावा अथवा मला आज्ञा झालिया मी करीन." याप्रमाणे पाटोलवावांनीं विनंति केल्यावर, श्रीमंतांनी बाबूराव केशव व राघोपंत गोडबोले यांम सरंजाम देऊन सचिवपंतांना आणण्यासाठी पाठविले. तों च शिंद्यांनी घाई करून जेजुरीस पलटण पाठवून पंतांना आपल्या गोटांत पुण्यास आणिलें व त्यांचा मान मरातब ठेविला. * त्यावर चौकशी सखारामपंत पानसे व सदाशिवभट दाते यानी सांगितली. पागेत बसून मनास आणतात. मग चौकशी अंती ज्या शागिर्दाने वपनसमयी बाईस स्पर्श केला त्याचे हात तोडावे, विष घालणाराचा वध करावा, व इतर गारदी वगैरे व खुद्द बाजीराव मोरेश्वर यास त्यांचे अपराधाचे मानाने कडक शिक्षा द्याव्या असे सुनावले व त्या श्रीमंतांच्या व नानांच्या सल्लयाने अमलांत आणिल्या. पानशांचा व पाटीलबोवांचा स्नेह पूर्वीपासून होता हे जाणून नानांनी मुद्दाम या कामांत सखारामपंत यांना चौकशी कामदार नेभिले व त्यांनी दिलेला निकाल अमलांत आणिला ( शके १७१५ चैत्र ).. १०. खड्यांच्या लढाईतील पानशांची कामगिरी. शके १७१६ साली मराठ्यांच्या इतिहासांतील शेवटचा मोठा शौर्याचा व अभिमानाचा एक प्रसंग घडला; तो म्हणजे खड्ची मोहिम हा होय. या मोहिमेंत