पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ पानसे घराण्याचा इतिहास. या मोहिमेंत तोफखान्यांतील तोफांच्या मान्यांनी खंदक काबीज करते वेळीं, नलिकंठराव भिवराव व केशवराव व्यंकटेश पानसे हे दोघे बंधु ठार झाले. या दोघांचे नातें आजा नातूचे होते. या दोघां शूर व कर्त्या पुरुषांचा मृत्यु एकाच वेळीं झाल्यामुळे पानशांचे घरांत मोठा आकांत झाला. दोघांस हि पुत्रसंतति झाली नव्हती. दोघांच्या हि विधवा स्त्रिया त्यांच्या मागे हयात होत्या. हे सर्व दुःख स्वामिनिष्ठ पानशांनी स्वराज्याच्या संरक्षणाकरितां गिळून या प्रसंगांत हि आपली वीरवृत्ति ढळू दिली नाहीं. ९. सचिवप्रकरण. शके १७१५ च्या सुमारास सचिवप्रकरण उद्भवले असतां त्याच्या चौकशीचे काम सखारामपंत पानसे यांच्याकडे आले होते. या प्रकरणाची थोडक्यांत हकीकत पुढीलप्रमाणे आहेः- श्री. रघुनाथराव चिमणाजी सचिव हे शके १७१३ च्या सुमारास वारले आणि त्यांच्या जागी यांचे पुत्र शंकरराव यांची स्थापना झाली. ते वयाने लहान असल्याच्या सबबीवर पेशवे सरकारांतून नानांनी त्यांचे संस्थान चालविण्यासाठी बाजीराव मोरेश्वर नांवाचा आपला एक हस्तक कारभारी म्हणून नेमला. सचिवांना सावत्र आई असून तिचे व त्यांचे वांकडे पडले. ही सावत्र आई व कारभारी यांचे एकचित झालें व कारभारी, बाईच्या तंत्राने वागू लागला. ह्यामुळे सचिवांचे व कारभाच्याचें वांकडे आले. एके दिवशीं साचिवांनी * मातोश्रीस अर्ज केला जे, वडिलांचा काळ होऊन फार दिवस झाले, अतःपर केश ठेवणे हे लोकविरुद्ध आहे. बाईस हे मान्य होईना; सबब बलात्काराने तिचे केश काढाविले त्यामुळे मायलेकरांतील भांडण जास्त विकोपास गेलें; आणि सचिवांच्या दौलतींत एकीकडे सोचव व दुसरीकडे त्यांची सावत्र आई आणि बाजीराव दिवाण असे दोन पक्ष उघड उघड होऊन बखेडे माजत चालले. बाजीराव हा नानांनी नेमलेला असल्यामुळे त्याला वाटे की, आपण कांहीं केले तरी चालेल. एके दिवशीं सचिवांच्या तयार केलेल्या स्वयंपाकांत अचाच्याकडून कोणीं विष घालविल्याचे उघडकीस आले. तेव्हां, तत्काळ पंतसचिव हे घरांतून बाहेर पडले व कामापुरता लवाजमा बरोबर घेऊन जेजुरी येथे येऊन राहिले. त्यावर बाजीराव दिवाण याने नानांना खोटे च कळविलें की, पंतांनी सरकारची शिस्त मोडून बंड उभारले आहे; तरी ते मोडण्यासाठी सरकारांतून स्वार शिबंदी पाठवावी. शिवाय नानांच्या विश्वासांतील एक तेलंगी ब्राह्मण होता त्याला मध्यस्थीबद्दल द्रव्य देण्याचे कबूल करून, बाजीरावाने त्याजकडून नानाला भलते च समजाविले. तेव्हां पांच सातशें स्वार व गारदी, शामराव बल्लाळ हिवरेकर याच्या हातांखालीं देऊन, नानांनी त्यास बाजीरावाकडे मदतीस पाठविले. त्यांना धऊन बाजीरावाने राजगडास वेढा दिला, परंतु किल्लेदाराने त्याची डाळ शिजू दिली