पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. ९१ तोफांचा सतत मारा व रसदीचा तुटवडा यामुळे किल्लयांतून दररोज दहा, वीस, पन्नास माणूस पळून जाऊ लागले. या वेळी पुण्याहून नीलंकंठराव भिवराव व केशवराव व्यंकटेश हे दोघे तोफखान्याचे मदतीस आले होते. त्यांनीं कांहीं तोफा किल्लयाजवळील मैराळ नांवाच्या टेकडीवर नेऊन तेथून किल्लयावर मारा सुरू केला. हा मारा पूर्वीपेक्षा जास्त कारागर होऊ लागला. आश्विन शुद्ध नवमीस शत्रूने मराठ्यावर किल्लयांतून जोराचा मारा केला. या दिवशी दोघांत मातबर लढाई झाली. तींत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. याच दिवशी माधवराव पानसे यांनी दोन लहान तोफा घेऊन धारवाडच्या पेठेवर हल्ला केला, व शत्रूचे बरेच नुकसान करून पेठ काबीज केली. पुढे किल्ला लवकर हस्तगत होत नाही म्हणून पेशव्यांच्या दिमतीस असलेला इंग्रजं क. फ्रेडरिक याने आपण स्वतः किल्ला घेतों अशी वढाई मारून व सर्व प्रकारची तयारी करून एके दिवशी किल्यावर हल्ला चढविला, परंतु किल्लयांतलि लोकांनी वरून भयंकर आगीचा वर्षाव करून इंग्रजांना परत फिरण्यास भाग पाडले. या हल्लयांत इंग्रजांचे पुष्कळ नुकसान झाले व घमेंडखोरीनें कोणाचे न ऐकल्यामुळे फजिती हि पदरी पडली. - तोकखान्यांत या सुमारास साच्या दहा तोफा होत्या. त्यांपैकी एक विडी तोफ ** होती ती फुटली. " बाकी नऊ राहिल्या, त्यांत दोन जंबुरे आहेत, ते उपयोगी पडावयाचे नाहीत, बाकी राहिल्या सात; पैकी पांच बिडी आहेत. त्यांचे बहुत बार काढता येत नाहीत, फार बार काढल्यास जाया होतील हे भय. बाकी दोन तोफा मात्र पंचरशी चांगल्या आहेत. तेवढ्या मात्र चालतात. यासाठी पुण्याहून कारखान्यांतील मोठमोठ्या तोफा मागविल्या होत्या. कारण, * किल्लयावर चाळीस तोफा होत्या. शत्रूस रसद न मिळू देतां किल्लयांतील लोकांची उपासमार करून किल्ला घ्यावा असा बेत होता. तरी पण, त्यांतल्या त्यांत त्या वेळीं कांहीं तोफा थेट किल्लयापर्यंत नेऊन व जोराचा मारा करून किल्लयावरील तोफा पाडाव केल्या. यानंतर पुण्याहून चार मोठ्या तोफा व चार हजार फौज पाठविली. ती मार्गशीर्ष अखेर धारवाडास येऊन पोहोचली. या सर्व तोफा लावून फिरून किल्लयावर मारा केला. त्या वेळी किल्लयाचा फक्ते बुरूज ढासळला. . या वेळी किल्लयांत कडक दुष्काळ पडून आंतील लोकांची विपत्ति वाढली. त्यांत मराठ्यांनी आंतील लोकांस पाणी हि मिळू देण्याचे बंद केले. किल्लयांत फक्त एक च विहीर होती. तिचे पाणी दहा पांच हजार लोकांस कसे पुरणार ? म्हणून किल्लेदाराने भाऊकडे तहासाठी वकील पाठविला, पण तह जमेना. इतक्यांत पानशांनीं तोफांच्या जोरावर खंदक हि काबीज करून घेतला. तेव्हां बाद्रजमाल खान किल्लेदार शरण आला. सात महिने किल्लयास वेढा पडला होता. कार्नवालीस याने या वेळी टिपूस दुसरीकडे अडकवून ठेविल्यामुळे त्याच्याकडून बद्रिजमालास बिलकुल मदत झाली नाहीं. त्यामुळे खानाने आपण होऊन किल्ला पेशव्यांचे हवाली केला; व शके १७१३ चैत्र शुद्ध तृतीयेस पेशव्यांचे निशाण किङ्यावर चढ लें.