पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० पानसे घराण्यांचा इतिहास. खान्यांत मोठमोठ्या * पंधरा तोफा होत्या. बाकीच्या येणे आहेत. बैल आणावयासाठी गेले आहेत. तोफखान्याचे सरदार रा. कृष्णराव पानसे यांचे चिरंजीव येतात. त्याप्रमाणे शके १७१२ ज्येष्ठ शुद्ध पंचमीस * माधवरावं कृष्ण स्वारीसमागमें यावयाकरितां आज मुहूर्ते करोन निघोन बाहेर येऊन उतरले आहेत " ( खरे ऐ. ले. सं ४३३५). भाऊ हे सैन्य घेऊन तासगांवास आले व तेथे च इंग्रजांची दोन पलटणे त्यांना येऊन मिळाली. पावसाळा अर्धा अधिक संपल्यानंतर श्रावणांत भाऊंनी तासगांवाहून कूच केले. त्यावेळी “ तोफखाना पलटणासुद्धां गोकाक नजीक (: कृष्णा ) पार व्हावयास पाठविला. तो * पार झाला. त्यास मनोळीच्या सुमारे जाण्याविषयी पुढे भाऊंनी आज्ञा केली, आणि त्यास मिळण्याविषयी रामचंद्रपंत अप्पास कळविलें, स्वतः भाऊंनी कृष्णापार होऊन व एकोडीचे ठाणे घेऊन टिपूचे प्रांतांत ** हंगाम सुरू केला. त्यांत त्यांनी धारवाडचा किल्ला काबीज करण्याचे काम महत्त्वाचे ठरवून तिकडे रोख फिरविला. परंतु, धारवाड घेतांना शत्रूचा पायबंद आपल्यास बसू नये म्हणून प्रथम त्यांनी हुबळी, दोदवाड, मिस्त्रिकोट, लक्ष्मेश्वर, जडे, अनवटी वगैरे शत्रूची अनेक ठाणां तोफांच्या बळावर हस्तगत केली आणि मग धारवाडास येऊन किल्लयास वेढा दिला ( भाद्रपद ). धारवाडचा किल्ला मूळचा च मजबूत असून, टिपूने या वेळी त्याची आणखी जास्त. मजवुती केली होती. किल्लयांत तेरा हजार शिबंदी व पन्नास साठ तोफा होत्या. हा किल्ला घेण्याचे फार विकट काम आहे, म्हणून निझाम, इंग्रज व पेशवे यांच्या सेनापतांनी एके ठिकाणी बसून, केणी कोणत्या बाजूने किल्यावर मारा करावा याबद्दलच योजना निश्चित केली. त्यांत किल्लयावर चढाई करण्याचा पहिला मान पेशव्यांस द्यावा असे सर्वानुमते ठरल्यावरून माधवराव पानसे यांनी आपल्या हातांनी पहिली तोफ डागली. तिचा गोळा अचूकपणे किल्लयांत जाऊन पडला. हा शुभ शकुन समजून सर्व सैन्यांतील लोकांस हुरूप आला. अशा रीतीने वेढ्याचे काम सुरू झाले. वेढा सुरू झाल्याचे दिवशी “ सरकारच्या तोफा लागू करून सवा शें दीड शें पर्यंत गोळे किल्लयांत टाकिले. याप्रमाणे बहुधा रोज मराठ्यांची व आंतील किल्लेदाराची गोळागोळी होत असे. तत्रापि एकट्या तोफांच्या बळावर किल्ला लवकर हस्तगत होणार नाही, असे जाणून किल्लयांत जाणारी रसद लुटण्याचा हि एक प्रयत्न चालविला. पानशांनी या धारवाडच्या वेढ्यांत ज्या प्रख्यात व लांब पल्याच्या तोफा बरोबर घेतल्या होत्या त्यांतील प्रमुख तोफांची नांवें राम, दुर्गा, हणमंत, अमानतडाखा याप्रमाणे होती. पानशांचे म्हणणे की, “ किल्लयास मोर्चे लावणे तेव्हां किमानपक्ष दहा हजार गारदी व पंचवीस तोफा पाहिजेत. मध्यंतरीं रोज सकाळपासून तोफा किल्लयावर डागून मारा करीत व संध्याकाळी परत गोटांत आगीत. मोठ्या तोफांसाठी पुण्यास पत्र लिहून तेथून तोफा आणविल्या. पुण्याहून गरनाळ रवाना झाली. !*