पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) माहिती न मिळाल्यामुळे या पुस्तकांत ती उणीव राहिली आहे; त्यास आमचा निरुपाय आहे ही गोष्ट वाचकांनी प्रामुख्याने लक्षात ठेवावी. एकाद्या जातीला अगर पक्षाला लागेल असा शब्द पुस्तकांत आल्याचे आम्हांला स्मरत नाहीं. तरी क्वचित् एकाद्या ठिकाणी तसा शब्द पडला असल्यास तो सहेतुक पडला नाही असे वाचक समजतील. | पुस्तक-प्रसिद्धीच्या खर्चाच्या बाबतीत तो बराच आमचे अंदाजाबाहेर वाढणार म्हणून या कामी आमचे स्नेही श्री. सावळाराम कोंडदेव पानसे यांनी सढळ हाताने मदत करण्याचे कबूल केले होते; परंतु दुर्दैवाने हे पुस्तक छापखान्यांत जाण्यापूर्वीच त्यांचा अकाली अंत झाला. त्यांचे पश्चात् त्यांच्या पत्नी श्री. सीताबाई यांनी आपल्या पतीने दिलेले आश्वासन पूर्ण केले. तसेच भोर येथील प्रसिद्ध वकील श्री. रा. रा. गहिनीनाथ माधवराव पानसे यांनी हि या कामी उदारमनाने सहाय्य केलें याबद्दल आम्ही दोघांचे हि फार आभारी आहोत. शिवाय या पुस्तकाच्या प्रति घेण्याचे अगाऊ च ज्यांनी आश्वासन दिलें,, त्यांचे हि आम्ही आभार मानतो. सरदार आबासाहेब मुजुमदार व भा. इ. सं. मंडळाचे उत्साही सेक्रेटरी श्री. दत्तो वामन पोतदार यांनी फुरसत नसतांही आमच्या विनंतीस मान देऊन या पुस्तकास अनुक्रमें मार्मिक व सुंदर प्रस्तावना व पुरस्कार लिहून दिल्याबद्दल अ त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सरते शेवटी या पुस्तकाचा वेळोवेळी तयार झालेला भाग वाचून त्यांत उपयुक्त सुधारणा सुचविण्याचे व तसेंच प्रफे तपासण्याचे व इतर बाबतींत, आपलेपणाचे भावनेने केलेल्या मदतीबद्दल श्री. सिद्धेश्वर वासुदेव सुभेदार, शिक्षक प्रा. स्कू. टे. कालेज पुणे यांचे व तसल्याच तहेची मदत केल्याबद्दल श्री. लंबोदर वामन मांडके, एम्. ए. शिक्षक ट्रे. कॉलेज पुणे यांचे आम्ही फार फार आभारी आहोत. कोजागरी पौर्णिमा शके १८५१ ।। | ता. १७ आक्टोबर १९२९ । । केशव रंगनाथ पान ले.