पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) पत्रे व इतर माहिती मिळविण्याचे बाबतींत परिश्रम घेऊन बरी च मदत केलीः याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुणे प्रांतीं आगमन होण्यापूर्वी पानशांची वस्ती पानगांवी होती, म्हणून आम्ही तेथे जाऊन जुनी दप्तरें तपासलीं. त्यांत एक जुना महत्त्वाचा लेख सांपडला. त्यांत पानसे हे मूळ कर्नाटकांतून आले, असा उल्लेख असून त्यानंतर त्यांनी ज्या ज्या गांवच्या ज्योतिष--कुलकरणाच्या वृत्ति संपादन केल्या, त्या गांवांची नांवें व इतर बरीच माहिती दिली होती. लेखाच्या शेवटीं पानशांचा मूळ पुरुष गोविंदपंत याजपासून शके. १६६२ पर्यंत निरनिराळ्या ठिकाणी कायम वस्ति करून रहात असलेल्या सर्व पानसे घराण्याचा संगतवार वंश-वृक्ष हि लिहून ठेविला होता. या लेखाच्या आधाराने इतस्ततः पसरलेल्या घराण्याचा संगतवार वंश-वृक्ष तयार करण्यास बिलकूल पंचाईत पडली नाहीं. हाच वंशवृक्ष इतर घराण्यांच्या तुटक मिळालेल्या वंश-वृक्षावरून कायम करून त्यास आजपर्यंत पुढील झालेल्या संतते-वाढीच्या शाखा जोडून या पुस्तकाच्या आरंभ तो दिला आहे. या वरील सांपडलेल्या लेखामुळे पानसे घराण्याबद्दल प्राचीन व महत्त्वाची माहिती, पूर्वी जी संशयात्मक व उडाफ्याने मिळाली होती, ती खात्रीलायक व सुसंगत रीतीने देतां आली. शिरवळ प्रांतीं, भोळी, तोंडल व लोणी या गावी जाऊन, तेथील पानसे मंडळींच्या संग्रही असलेल्या माहितीचा हि आम्ही या कामीं उपयोग करून घेतला आहे. वर सांगितल्या प्रमाणे जो वंश-वृक्ष आम्हीं तयार केला आहे, त्यांत चूक राहू नये अशी जरी काळजी घेतली आहे, तरी कदाचित् चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांत दोष रहाणे संभवनीय आहे. तरी त्यांत चूक आढळून आल्यास मेहेरबानीने आम्हांस कळवावी म्हणजे द्वितीयावृत्तीचा सुदैवाने प्रसंग आल्यास ती दुरुस्त करण्यास ठीक पडेल. वंश-वृक्षाकडे लक्ष दिल्यास असे आढळून येईल की, कांहीं घराण्यांच्या शाखा जोमदार आहेत, परंतु कांहीं घराण्यांच्या वठत चालल्या आहेत. उदाहरणार्थः-रामजी परशुराम व विसाजी परशुराम या दोन घराण्यांतील भरभराटच्या काळांतील सात पिढ्या घेतल्यास, त्यांत एकंदर शंभर पुरुष निपजून त्यांपैकी सातवे पिढीचे अखेरीस या पात्र हयात सांपडतात. त्याचे उलट भोळीकर, तोंडलकर अगर वाठारकर नया तितक्याच पिढ्यांचा हिशेब केल्यास अडतीस पुरुष निपजून शेवटीं सात् । आठ च पुरुषांची हयाती सांपडते. संतति-नियमन अगर संतति-संवर्धन या दे बाबतींत विचार करणा-या एखाद्या आधुनिक चिकित्सकाने या कारणांचा शोध लावा अशी आमची त्यास आग्रहाची सूचना आहे. हैं पस्तक लिहिण्याच्या कामी आम्हास मुख्यत्वे राजकीय बाबींतील च सामग्री मिळाली. प्रासद्ध पुरुषांची खाजगी रहाणा, त्यांची दिनचयों, आचार, विचार, धार्मिक व सामाजिक मते वगैरे माहिती ही फार मनोरंजक व बोधप्रद असते. परंतु तशी