पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. मजल मारून सावनूर गांठले. तेव्हां सावनूरास असलेली टिपूची फौज पळून गेली. यानंतर टिपूने मराठ्यांच्या मुख्य फौजेवर रात्रीचे चोरटे हल्ले अनेकदा केले. मराठे नेहमी सावध असल्याने त्याचा कांहीं उपाय चालला नाहीं. एकदां तर पहाटेच्या वेळीं प्रहर रात्र असतां खासा टिपूने आपल्या सरंजामासुद्धां निघून, दोन टोळ्या करून तो नीट चालून आला. त्याने छबिन्यावरून गोटाच्या अघाडीस तोफांची व बाणांची मारगिरी फार केली. सरकारची फौज तयार होऊन त्याच्या तोंडावर उभी राहिली. * सरकारच्या तोफा हि लागू केल्या......सूर्योदयापासून दोन प्रहर पावेतों परस्परें तोफांची मागिरी जाहली. शत्रु तेथून माघारा अस्तमानास गेला. " या मोहिमेंत पुणे येथील “ तोफखान्यांतून बाणांची तरतूद होत आहे व तोफा थोर, रवाना करावयासाठी बाहेर काढल्या......चाळीस शेरी तोफ एक आहे” या हकिकतीवरून इतक्या मोठ्या तोफा जयवंतरावांनी बरोबर घेतल्या होत्या. एकदां शके १७०८ मार्गशीर्ष महिन्यांत टिपूने एका वारीत मराठ्यांना कोंडले होते. त्यांत मोठमोठ्या तोफा अडचणीचे जागीं सांपडल्या. परंतु पानशांनी आपल्या कौशल्याने सर्व तोफांसह ती फौज संकटांतून सुरक्षित बाहेर काढली. पुढे माघ महिन्याचे सुमारास तह करण्यासाठी टिपूनें आपले वकील पेशव्यांकडे पाठविले. ते * होळकराचे अघाडीस... तोफखान्याचे पलीकडे उतरले होते. सारांश या टिपूवरील पहिल्या मोहिमेंत पानशांनी आपली कामगिरी चांगली बजाविली. | शके १७०९ च्या श्रावण मासी दक्षिणा वांटतांना गणपतराव पानशांकडे दुसरा दरवाजा होता व तिस-या दरवाज्यावर माधवराव कुष्ण हे असून त्यांनी २८४१४ रु. ची दक्षिणा वांटली ( रावबाजी रोजनिशी पृ. २२७ ). या नंतर दोन वर्षांनी म्हणजे १७१२ मध्ये जयवंतराव यशवंत हे वारले. ते स्वारी शिकारीस जाणे झाले तर अग्निहोत्राच्या सर्व तयारीनिशी जात असत. बरोबर त्यांची स्त्री हि असे. पानशांच्या घराण्यांत जयवंतराव हे फार धाडसी व शरीराने धिप्पाड होते. ८. टिपूवरील दुसरी मोहीम ( धारवाडचा वेढा, ) बदामीच्या वेढ्याची म्हणजे च टिपूवरील पहिल्या मोहिमेची हकीकत वर आली आहे. त्यानंतर शके १७११ मध्ये पुन्हा टिपूवर दुसरी मोहीम करण्यास मराठे तयार झाले. वास्तविक या मोहिमेस मूळ प्रारंभ इंग्रजांकडून झाला व त्यांनी निझाम आणि मराठे यांना मदतीस म्हणून बोलावून घेतले. टिपूचा मुलुख जो जिंकला जाईल तो तिघांनीं आपसांत सारखा वाटून घ्यावा या अटीवर या मोहिमेसाठी मराठ्यांनीं व निझामाने इंग्रजांना मदत देण्याचे ठरविले. मराठ्यांचे सेनापतित्व परशुरामभाऊ पटवर्धन यांच्याकडे देण्यांत आले, भाऊबरोबर पंचवीस हजार फौज व माधवराव कृष्ण पानसे यांजबरोबर तोफखान्याचा मुबलक सरंजाम होता. तोफ