पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पानसे घराण्याचा इतिहास. त्याने आपल्या तहवारजंग नांवाच्या एका सरदारास पंचवीस हजार सैन्य देऊन मराठ्यांच्या मदतीस ठेविलें. | टिपूने बदामीच्या किल्याचा बंदोबस्त फार उत्कृष्ट ठेविला होता; त्यांत हि तो किया पूर्वीपासून मजबूत म्हणून प्रसिद्ध होता. अशा त्या किल्लयास मराठ्यांनी वैशाखांत अक्षय्य तृतीयेस वेढा देऊन मोर्चेबंदी केली. आंतील लोकांनी मराठ्यांचे मोर्चे उठवावे म्हणून शिकस्त केली, तथापि दररोज त्यांचे मोर्चे पुढे पुढे सरकत च होते. इतक्यांत पाऊण लाख फौज घेऊन टिपूने पट्टण सोडून बदामीकडे रोख वळविल्याची बातमी आली; तेव्हां नानाचा धीर सुटला. किल्लयास वेढा घालून अठरा दिवस झाले, तरी किल्ला हस्तगत होत नाही हे पाहून नानांनी परत पुण्यात जाण्याचा बेत केला. जयवंतराव पानसे यांस हा बेत कळतां च ते नानाकडे गेले व म्हणाले की, वेढा पूर्ण होऊन आतां च शत्रूची गळचेपी सुरू जाहली आहे. या वेळी आपण घाबरण्याचे कांहींच कारण नाहीं. नानास रणांगणावरील युद्धकौशल्याचे ज्ञान अगदी बेताचे च असल्यामुळे, या बोलण्यावर त्यांचा भरवंसा बसेना. जेव्हां जयवंतराव यांनी छातीस हात लावून प्रतिज्ञेने सांगितले की, दोन दिवसांत किल्ला सर करतो, तसे न झाल्यास आपल्यास वाटेल ते करावे. नानांनी ही गोष्ट मान्य करून पुण्यास परत फिरण्याचा बेत रहित केला. पानशांनी रात्रंदिवस काम चालवून किल्लयाचे तटाखालीं भुयारे खोदून त्यांत दारूचे बुधले भरले व शत्रूवर बाहेरून तोफांचा मारा करून त्यास किल्लयाबाहेरील, चालविलेल्या या उद्योगाचा सुगावा लागू दिला नाही. नंतर तोफांची नीट मांडणी करून मारगिरी सुरू केली. जयवंतराव व सखारामपंत हे दोघे पानसे बंधु, मोठमोठ्या तोफा स्वतः डागू लागले. किल्लयांत शत्रुसैन्याची अशा रीतीने धांदल उडवून दिल्यावर, त्यांनी युक्तीने तटाखालील सुरुंगांस आग लावून दिली. त्या सुरुंगांच्या धडाड्यामुळे तट जागजागीं पडून त्यांत अनेक खिंडारे झाली व शत्रु उघडा पडला. अशा रीतीने विसाव्या दिवशी म्हणजे वैशाख वद्य सप्तमीस पानशांनी केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे किल्ला पेशव्यांच्या ताब्यांत आला. बदामी घेतल्यावर नाना पुण्याकडे परत फिरले. त्यांच्या बरोबर जयवंतराव पानसे हि पुण्यास आले. जयवंतराव यांची प्रकृति अलीकडे बिघडत चालली होती म्हणून आराम घेण्यासाठी ते पुण्यास आले. बदामी घेण्यांत मुख्यतः तोफखान्याची मदत चांगली झाली. तोफांच्या अभावीं हा बळकट किल्ला पेशव्यांच्या हाती आला नसता. बदामी नंतर सखारामपंतांनी आपला तोफखाना टिपूची ठाणी घेण्याकरिता गजद्रगडाकडे नेला, व मोठ्या शौर्याने ते ठाणे त्यांनी काबीज केलें. | ७, टिपू व मराठे यांच्या चकमकी. | कर्नाटकांत या वेळीं: सावनूरकर नबाब संकटांत सांपडला होता. त्याला टिपूचे जरबेतून सोडविण्यासाठी बेहरे व होळकर यांनी एका अहोरात्रीत चाळीस कोसांची