पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. ८७ राहून लढाई होत नाही. गोळा मारतां च चार चहूकडे जातातं. फिरून या फौजेस जमा कोण करतो ? ही कवाईत कोण्या त-हेची ? या कवाईतीने मराठी फौज आम्हांस सांपडत नाहीं.” इकडे पुण्यास नानांनी कारस्थान करून नागपूरकर भोंसले, निझाम, व हैदर यांना मिळवून सर्वांनी एकदम उठून इंग्रजांस सतावून सोडण्याचे ठरविले. त्याप्रमाणे थेट मद्रासपर्यंत चाल करून हैदरने इंग्रजांचा पिच्छा पुरविला. तेव्हां इंग्रजांनी अखेरीस मराठ्यांशी तहाचे बोलणे लाविलें व पाटीलवावांनीं मध्यस्थी करून शके १७०४ ( सन १७८२ ) अधिक ज्येष्ठांत सालवाईचा तह घडवून आणला. अशा रीतीने हे युद्ध थांबले. ६. बदामीचा वेढा व दोघे पानसे-बंधु शके १७०६ मध्ये टिपूने पेशव्यांच्या प्रांतावर स्वारी केली. तत्पूर्वी विदनुरास इंग्रजांची एक सबंध फौज कैद करून त्याला पाहिजे. तसा तह त्यांच्याकडून त्याने करून घेतला होता. त्यामुळे त्यास आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला होता. त्याने पेशव्यांची नरगुंद व कित्तूर ही संस्थाने काबीज करण्यास फौज पाठविली व ती हस्तगत केली. इकडे, आपला वकील पुण्यास पेशव्यांच्या दरबारी पाठवून त्याने सल्याचे बोलणे चालूच ठेविले होते. टिपू अत्यंत विश्वासघातकी होता. त्याची प्रतीति मराठ्यांना या व पुढील प्रसंगी चांगली च आली. या वर्षी पेशवे व निझाम यांच्या फौजेची तयारी नसल्याने, त्यांनी टिपूकडे दुर्लक्ष्य करून पेस्तर साली त्याच्यावर मोहीम करण्याचे निश्चित केले. हे वर्तमान समजल्यावर टिपू फार च शेफारला. त्याने घटप्रभा व मलप्रभा दुआबांतील पेशव्यांचा प्रांत घेऊन, थेट मिरजेवर हि स्वारी करण्याची तयारी केली. तेव्हां नानांनीं त्याच्यावर स्वारी करण्यासाठी तयारी चालविली. नागपूरकर भोसल्याची समजूत पाडून, मदतीस येण्याविषयी नानांनी त्याचे वचन घेतले. शके १७०७ च्या श्रावण महिन्याचे अखेरीस हरिपंत तात्यांनी सुमुहर्ताने वानवडीवर डेरे दिले. कार्तिक अखेर सर्व फौजा जमा झाल्या. तुकोजी होळकर पुण्यांत च होते. ते व तात्या कूच करून निघाले. मागून चार पांच दिवसांनी खुद्द नाना व आपल्या तोफखान्यासह जयवंतराव आणि सखारामपंत पानसे हे दोघे बंधु त्यांच्या पाठोपाठ निघाले. मुधोजी भोंसले हि वाटेत त्यांना येऊन मिळाले. पुढे त्या सैन्यास यादगिरी येथे निझामअल्ली आपल्या सैन्यासुद्धा येऊन सामील झाला. टिपूचा एक सरदार सैदबुरान हा कित्तूरकडे होता, त्याचा समाचार घेण्यास त्याच्या तोंडावर गणेशपंत बेहेरे हे गेल्या वर्षापासून बसलेच होते. त्यांच्या मदतीस आतां होळकरांना पाठविण्यांत आले. नानांनी व निझामाने प्रथम बदामी काबीज करण्याचे ठरविले. पण बदामीजवळ जातां च दोघांत कांहीं कारणांनी बेबनाव झाल्यामुळे निझामअल्ली स्वतः परत निघाला. नानांनी त्याची पुष्कळ समजूत घातली, पण तो राहीना. मात्र