पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. दिले. त्यावरून त्यास पंचाने माफी दिली. हें माफी--पत्र वैशाख वद्य ७ चे आहे. शकाचा आंकडा कसरीने गिळंकृत केल्यामुळे समजण्यास मार्ग नाही. वरील घालून दिलेल्या नियमानें पूर्वी मनुष्य पाहिल्या बरोबर त्याची जात समजत असे. आतां अशा त-हेचे निर्बध नाहीसे झाले आहेत. यजमानाने पुढे पाठविलेल्या चाकरास यजमान समजून त्याची बरदास्त ठेविली गेल्याची उदाहरणे अलीकडे घडली आहेत ! ५. कर्नल गॉडर्डचा पराभव ! वडगांवचा तह होऊन इंग्रज-मराठ्यांचे युद्ध जरी थांबलें तरी तो तह कायमचा टिकला नाही. तहांत ठरल्याप्रमाणे श्रीमंत दादासाहेब हे पाटीलबावाबरोबर झांशी. कडे कायम राहण्यासाठी म्हणून निघाले असतां, वाटेत शके १७०१ च्या आषाढ महिन्यांत निसटून ते सुरतेस गेले व फिरून इंग्रजांच्या कच्छपी लागले. इंग्रजांनी हि त्यांना मदत देण्याचे कबूल करून त्याप्रमाणे क. गॉडर्ड याचे हातांखाली सैन्य देऊन त्याची गुजराथेंत रवानगी केली. इकडे पेशव्यांनी त्यास तोंड देण्याकरितां पाटीलवावा व होळकर यांना पाठविले. शिवाय मागाहून दस-याच्या मुहूर्ताने विश्वासराव पानसे यांजवरोवर तोफखाना देऊन त्यांची हि रवानगी केली. या वेळी हि इंग्रजांनी क. हार्टली याजवरोबर सैन्य देऊन त्यास क. गॉडर्ड याचे मदतीस पाठविले. गॉडर्ड यांनी जलदी करून प्रथम उभई व अमदावाद ही पेशवे सरकारची ठाणी काबीज करून नंतर वसई घेतला; आणि कल्याणचे. ठाणे सर करून . बोरघाटापर्यंत चौक्या बसविल्या. या वेळी इंग्रजांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ वज्रजागिणी ( हल्लींची वज्राबाई ) जवळ ठेविला होता. या वेळी हरिपंत तात्यांचा मुक्काम दहिवेलीस व विश्वासराव पानसे यांचा वदलापुरास होता. इंग्रजी सैन्याचा बेत पुण्यावर स्वारी करण्याचा असल्यामुळे, ते बोरघाट चढून खंडाळ्याच्या मुक्कामास आले. हरिपंत तात्यांनी व पाटीलबावांनीं, ही गोष्ट ध्यानीं येतां च आपला तळ कारल्यास दिला व इंग्रजी सैन्याचे तोंडावर मारा सुरू केला. पानशांनी आपला तोफखाना बदलापुराहून इंग्रज सैन्याच्या पिछाडीस आणून त्या बाजूने हल्ला सुरू केला. अशा रीतीने पानशांनी इंग्रजी सेनेचा कोंडमारा करून त्यांची रसद बंद केली. शके १७०३ च्या चैत्र शुद्ध अष्टमीस इंग्रज हे आपल्या तीन पलटणी, ७०० घोडदळ, व दहा तोफा बरोबर घेऊन रसद आणीत असतां त्यांचेवर हल्ला करून चार हजार बैल, उंट, छकडे, तोफेचे गोळे, डेरे व इतर बरेच सामान पेशव्यांच्या सैन्याने लुटले. क. गॉडर्ड यास रसद मिळेना, तेव्हां तो सैन्यानिशीं बारवाईकडे पळून जात असतां, पानशांनीं त्याजवर तोफांची मारगिरी करून तीन कोस त्याचा पाठलाग केला. या मारागिरांत के, गॉडर्ड याचा भाचा व क. पारकर ( एक दुय्यम अधिकारी ) हे ठार झाले. क. गॉडर्ड पुढे मोठ्या हलाखीने आणि कष्टाने पनवेलीस गेला. श्रीमंतांचे पुण्येंकरून इंग्रेज नामो हुरम झाला. या वेळीं गॉडर्ड म्हणाला “ मराठी फौजेचे बळ भारी. त्यांत समोर उभे