पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावे. रखवालदारांच्या अगों ती चोरी सौंपवत व त्याचे काम पुरे होई म्हणजे यापुढे त्या दुस-या गांवच्या रखवालदारांनी एक चोरी तरी पकडून द्यावी किंवा आपल्या गांवांतून चाराचा माग तिस-या गांवी गेला आहे असे तरी सिद्ध करून द्यावे. या शिवाय त्यांना तिसरा उपाय नसे. अशा रीतीने या गांवाहून त्या गांवीं या प्रमाणे तपास करीत. चौर जेथे गेला असेल तेथपर्यत माग काढून, अखेर चोर पकडीत. एकाद्या गांवांतून पुढे माग निघत नसेल व त्या गांवींहि चौर सांपडत नसेल, तर त्या गांवच्या रखवालदारांना वर सांगितल्या प्रमाणे चोरीच्या मालाची भरपाई करावी लागे. सारांश, एक तर चोर सांपडून त्याच्याकडून मालकास माल परत मिळे किंवा न सांपडला तरी रखवालदारांकडून मालाची किंमत मिळे. अशा रीतीने स्वराज्यांत घर बसल्या चोरीस गेलेला माल मिळे, अगर मालाची किंमत मालकास मिळे. - वरील तपासाच्या पद्धतीमुळे चोच्या फारशा किंबहुना मुळीं च होत नसत. पूर्वी वृद्ध माणसांच्या तोंडून असे ऐकण्यात येत असे की, खेड्यांपाड्यांत घरांस कुलुपे लावण्याची फारशी पद्धति नव्हती, दारास कडी घालून घरच्या मालकानें खुशाल बाहेर जावे, चोरीची धास्ती त्यास बिलकूल नसे. कांहीं कांहीं कानाकोप-यांतील खेडेगांवांत, अद्याप ही रीति आढळून येते. ४. पूर्वीच्या कांहीं चाली-रीति. पूर्वी प्रत्येक जातींतील लोकांस आपले पेहराव, समाजांतील वागणूक, लग्न कार्यातील मिरवणुकी वगैरे संबंधाने हि पूर्वापार चालत आलेल्या नियमानुसार वागावें लागत असे. गुरव, सुतार, सोनार, न्हावी, धोबी, माळी, चांभार, महार वगैरे प्रत्येक जातींतील लोकांनी आपली पागोटी कोणत्या त-हेने बांधावी, अंगरखे, बंड्या कोणत्या त-हेच्या कराव्या, धोतरे कोणत्या तन्हांनीं नेसावीं, गंध कसे लावावें, मिरवणूकी कशा रीतीने काढाव्या वगैरे अगदी बारीक सारीक गोष्टींत हि निर्बध घालून दिलेले असत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गांवकरी पंच त्या संबंधांत पंचाईत बोलावून त्याची चौकशी करीत व झालेल्या गुन्ह्यांबद्दल दंडाची शिक्षा करीत. | सोनोरी येथे मंगनाथ वल्लद बकनाक महार यांनी आपल्या मुलाचे लग्नाचे वेळी नवरा नवरी घोड्यावर बसवून ग्रामदैवत भैरवनाथ याचे दर्शनाकरितां मिरवत आणली. महारांनी मिरवणूक बैलावर बसून काढली पाहिजे, हा त्या वेळचा नियम मोडल्याबद्दल गांवपंचाने त्यांस प्रश्न विचारला. त्यांनी पुण्याकडे अशी मिरवणूक काढतात असे सांगितले. पंचांनी तसा पुरावा दाखल करण्याबद्दल त्यास पंधरा दिवसांची मुदत दिली. महार लोकांत घोड्यावरून मिरवणूक काढण्याची त्या वेळीं कौठे च चाल नसल्यामुळे मंगनाक यास तसा पुरावा मिळाला नाही. शेवटी त्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफीची याचना करून असे वर्तन फिरून घडणार नाही, असे पत्र लिहून