पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. समजले. तेव्हां ब्रह्महत्या झाल्याचे समजल्यामुळे सरकाराने या प्रकरणाची चौकशी चालविली; त्या कामांत दिवे व सोनोरीच्या पाटलास सर्व बेरड पकडून पुण्यास पाठविण्याबद्दल हुकूम आला. त्या प्रमाणे सर्व बेरडांना पुण्यास पाठविण्यांत आले. तेथे त्यांची सर्व चौकशी झाली व खरी हकीकत समजल्यानंतर बेरडांना दोषमुक्त करून सोडण्यांत आले. या ब्रह्महत्येचा परिणाम मात्र पानशांच्या मनावर त्या वेळी बराच झाला व अद्यापि हि भाविक पानसे मंडळींच्या मनावर तो थोडा बहुत अंमल करीत आहे. हा ब्राह्मणः पिशाच्च झाला असून तो पानसे घराण्याला मधून मधून त्रास देतो अशी या भाविक मंडळींची समजूत आहे. तो पिशाच्च रात्री बेरात्री घरांत फिरतो, घरांतील बायका मुलांना त्रास देतो, त्यांच्या शरीरप्रकृति नीट राहू देत नाही व वंशवृद्धि होऊ देत नाही, इत्यादि प्रत्ययाच्या गोष्टी होतात असे सांगतात. याला उपाय म्हणून ते मधून मधून मांत्रिक व दैविक वगैरे उपचार करीतच असतात. सताराम अय्या हा ब्रह्मचारी होता सबब त्याचे नांवाने प्रत्येकाने निरनिराळे पिंपळाचे वृक्ष लावून त्यास दगडी पार बांधून त्यावर त्याची स्थापना केली आहे. हा सर्व धार्मिक भावनेचा परिणाम आहे. पण, ती खरी आहे असे मानणारा समाज, ती खोटी आहे असे मानणा-या समाजापेक्षा मोठा आहे, एवढे मात्र खरे ! । ३. स्वराज्यांतील चोरीचा तपास लावण्याची पद्धत. स्वराज्यांत खेड्यापाड्यांनी चोरीचा शोध लावण्याची रीति जुने कागदपत्र पहात असतां आम्हांस आढळली, त्यावद्दल येथे थोडीशी हकीकत सांगितली, तर ती अप्रासंगिक होणार नाहीं; असे समजून ही माहिती देतो. स्वराज्यांतील ही तपासाची पद्धति बिन खर्चाची, बिन खटपटीची व लवकर निकालात निघणारी अशी असे. त्यासाठी आपला गांव सोडून जावे लागत नसे. शिवाय, तपास करणा-या अंमलदारांच्या कचेन्यांत हेलपाटे घालणे, हरघडी तेथील अपमानकारक संभावना सहन करणे हा ही त्रास नसे. चोरीच्या मालास मुकलेले पुरविले, पण अधिका-यांची त्रासदायक चौकशी नको अशी हल्लींसारखी परिस्थिति त्यावेळी नव्हती. गांवांत ज्याच्या घरी चोरी होई तो चोरीची खबर गांवच्या मुकदमा ( पाउला ) स देई. पाटील गांवच्या सर्व महार रामोशी बेरड वगैरे रखवालदारांस बोलावून आणून त्यांना त्या चोरीचा तपास लावण्यास फर्मावी. त्यांनी चोरीचा तपास न लाविल्यास त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल भरून घेण्यांत येई, म्हणजे एक प्रकारें चोरीची हमीदारी या रखवालदारांवर टाकण्यांत येई; आणि त्याला कारण हि तसेच असे. कारण चोर लोक बहुधा याच वर्गातलि असत. पाटलाने हुकूम दिल्या नंतर हे रखवालदार चोरीचा माग काढीत. तो माग आपल्या गांवच्या बाहेर निघून जर दुस-या गांवांत गेला असे आढळले तर, त्या दुस-या गांवच्या