पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ८३, भागांतील मोहिमांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली; म्हणून पेशवेसरकारनीं तोफखान्या-: च्या मजूमचा दरख व मौजे सांगवी तर्फ सांडस हा गांव जयवंतरावाच्या मातोश्रीचे खर्चाकरितां इनाम करून दिला ( परिशिष्ट क्रमांक २८ पहा ). जयवंतराव यांच्या मातोश्री पुढील आयुष्य धर्मकृत्यांत घालविण्यासाठी या वेळीं भीमातीरीं राहण्यास गेल्या होत्या. हा गांव शके १७४२ पर्यंत जयवंतरावांच्या वंशजांकडे होता. पुढे जयवंतरावाचे चिरंजीव गोपाळराव वारल्यानंतर त्यांच्या दोन स्त्रिया येसूबाई व निरावाई आपसांत भांडू लागल्या. भांडणाचा निकाल होई पर्यंत इंग्रज सरकारांनीं गांव जप्तीत ठेविला, व बायांस पेन्शन करून दिले. ते बायांच्या मृत्यूपर्यंत चालू होते. नंतर पुढे जयवंतराव यांचे नातू नारायणराव गोपाळ यांनी गांवची जप्ती उठवावी म्हणून इंग्रजांस विनंति केली. परंतु गांवाबद्दल पेनशन दिले आहे, सबब गांव परत देतां येत नाही, असे इंग्रज सरकारांनी सांगितले, तेव्हां पासून आता पर्यंत गांव मिळण्याची खटपट पुष्कळ केली, परंतु गांव मिळाला नाही. २. सीताराम अय्याचा खून शके १७०३ च्या सुमारास सोनोरी येथे एक गोष्ट घडली. गोष्ट जरा विशेष प्रकारची घडली, त्यामुळे तिचा परिणाम पानशांच्या घराण्यावर, तेव्हापासून आज-काल पर्यंत घडत आला आहे. आज हि मधून मधून तो परिणाम या घराण्यास जाणवत आहे. ही गोष्ट पुढील प्रमाणे आहे. | सोनोरी येथे पानशांचे घरी सीताराम अय्या नांवाचा एक तेलंगी ब्राह्मण शागीर्द म्हणून नौकरीस होता. शागीर्दीचे काम म्हणजे देवपूजेचे साहित्य तयार करणे, पाट पान करणे यजमानांचे सोवळे ओवळे ठेवणे वगैरे असे. त्याने पुष्कळ दिवस नौकरी केली. म्हातारपणीं यजमानांची परवानगी घेऊन त्याने देशी जाण्याचे ठरविले. परत जातांना त्याच्या मतीस विकार होऊन, त्याने देवघरांतील देवांच्या अंगावरील सोन्यामोत्यांचे दागिने चोरले. ते घेऊन तो सोनेरी सोडून निघाल्यानंतर थोड्याच वेळाने ही गोष्ट उघडकीस आली. तेव्हां, त्याचा संशय येऊन, तत्कालीन रीतीस अनुसरून ही बातमी पानशांन पाटलाच्या कानांवर घातली. पाटलाने या गांवच्या रखवालदार व बेरड लोकांना बोलावून आणून त्यांना ह्या चोरीचा तपास लावून चोर व चोरीचा माल घेऊन येण्याचा हुकूम केला. बेरडांपैकी काही जणांनी त्या ब्राह्मणाचा माग काढून दिवे घाटाच्या आसपास त्याला धरले. त्यांनी त्याला पकडलें खरें, परंतु तो सोनोगेस पर येईना, तो सशक्त व धट्टाकट्टा असल्याने त्याने बेरडांशी दोन हात केले. त्या वेळी बरीच धिंगामस्ती झाली व एक दोन बेरड जखमी हि झाले. त्यामुळे चिडून त्या बरेडांनी ह्या ब्राह्मणास तेथे ठार केले व चोरीस गेलेला मालं परत आणला. हा ब्राह्मण मेल्याचे ऐकून पानशांच्या मनास धक्का बसला. पुढे हे वर्तमान पुण्यास सरकारांत