पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मनिवेदन. सरकारी नोकरीची मुदत पूर्ण झाल्यानंतर इ. स. १९२४ साली आम्हीं पेन्शन् घेतले. पुढे अन्य व्यवसाय न राहिल्याने वाचनाकडे जास्त लक्ष लागले. आपटे, वर्वे, गोखले-रात वगैरे कोंकणस्थ ब्राह्मण घराण्यांचे इतिहास वाचण्यांत आले. त्यावरून आपल्या “पानसे घराण्याचा हि इतिहास तयार करावा अशी मनांत इच्छा उत्पन्न झाली. पानसे घराणे हैं फार जुने असून एकेकाळी मुत्सद्दीपणा, राजकारण, स्वामिभक्ति व क्षत्रिय-तेज वगैरे गुणांत प्रसिद्धीस आलेले होते. या घराण्याचा इतिहास लिहिल्यास त्यांतील वैभवशाली गत पुरुषांची कर्तबगारी जनतेपुढे येऊन, ऐतिहासिक माहितीत थोडीफार नवीन भर पडेल, असे विचार मनांत येऊन कार्यास सुरुवात केली. पूर्वकालीन ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे ही बहुमोल रत्नेच होत व जो जो त्या चरित्रांचे मंथन करून सत्य बाहेर काढावें तों तों तीं जास्तच प्रकाशमान होतात व पुढील पिढीतील तरुणांच्या अंगांत आपलेपणा जागृत करवून त्यांस राष्ट्राभिमानी वनवितात. एका व्यक्तीची अगर घराण्याची ऊर्जितावस्था होण्यास जी कारणे लागतात, तीच संबंध राष्ट्रास कारणीभूत होतात. याच कारणासाठी भूतकालीन इतिहास अभ्यासिला जातो. . इतिहास-संशोधन करणा-या अभ्यासकांनी आजपर्यंत मोठ्या मेहनतीनें जें वाङ्मय प्रसिद्ध केले त्याचा उपयोग आम्ही या कामी करून घेतला आहे. तसेच त्यांच्याजवळ आम्हांस उपयोगी पडणारा कांहीं जुना पत्र-व्यवहार प्रसिद्ध होण्याचा राहिला असल्यास त्यासंबंधी तपास केला, परंतु तसा अप्रसिद्ध पत्रव्यवहार कोणाही जवळ असल्याचे आढळून आले नाही. फक्त कांहीं पत्रे रा. रा. कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांचेपाशी होती; ती त्यांनी आम्हांस देऊन त्यांचा उपयोग या पुस्तकाचे काम करून घेण्यास परवानगी दिली, याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. | सुमारे पन्नास पंचावन वर्षांपूर्वी आम्ही लहान असतां सोनोरी येथे जहागिरदार पानसे यांच्या घरी जुन्या कागदपत्रांची बरीच दप्तरें होती हे आम्हास आठवत आहे. या हाती घेतलेल्या कार्यास या कागदपत्रांचा उपयोग होऊन साधनसामुग्रीची उणीव पडणार नाही अशी आमची समजून होती; परंतु तेथे जाऊन पाहतां असे आढळून आलें कीं, सर्व कागद काळाच्या भक्ष्यस्थानी पडून नाहीसे झाले होते; फक्त त्यांतून पुढे जरूर लागणारे कागद, ( सनदा वतनपत्रे वगैरे ) जें निराळे काढून जतन करून ठेविलें होते ते श्री. रामचंद्रराव गोविंदराव व गोपाळराव शंकरराव पानसे यांनी मोठ्या उत्सुकतेने दाखवून त्यांचा या पुस्तकाचे कामों उपयोग करून घेण्यास परवानगी दिली; तसेच श्री. विष्णु कृष्णराव पानसे यांनी जुनी कागद