पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७८ पानसे घराण्याचा इतिहास. खेरीज ) इनाम दिला ( परिशिष्ट क्रमांक २४ पहा ). हा गांव पाटील वावांनीं इनाम देण्यास एक कारण घडले होते. पाटील बावा या वेळी उत्तरेतून इकडे आले होते व त्यांचा पुणे येथील कारभा-यांशी अद्यापि एक जीव झाला नव्हता. अशा वेळी विश्वासराव पानसे यांना त्यांनी आपल्या विश्वासांत घेतले होते. ( बहुधा त्यांच्या तर्फे पाटील वावा व नाना फडणीस यांची दिलजमाई झाली असावी. भिवराव तर या खटपटींत होते हैं वर आलेच आहे. ) त्या साठी पाटील बाबांनी हे इनाम दिलें असावें. हा गांव इंग्रजी अम्मल सुरू होई पर्यंत पानशांकडे होता. इंग्रजी झाल्या नंतर शिंदे यांनी महाराष्ट्रांतील आपला कांहीं प्रांत ( आपले माळव्यांतील राज्यसलग राहण्यासाठी म्हणून ) इंग्रजांना दिला व त्याच्या मोबदल्यांत उत्तर हिंदुस्थानांत स्वतःसाठी नवीन ( इंग्रजांचा ) प्रांत मिळविला. त्या मोबदल्यांत नाणवली गांव इंग्रजांच्या खालशांत गेला. त्या ऐवजी उत्तरेकडे पानशांना आपण दुसरा गांव देऊ असे ग्वाल्हेर दरवाराने ठरविले होते; परंतु, त्या मोबदला जो गांव मिळावयाचा तो अद्याप पर्यंत मिळाला नाही. माशानें माणिक गिळलें ! मौजे पानगांव, सरकार परंडे येथील मोकासा, निंबाजी नाईक निंबाळकर यांजकडे, पेशवे सरकारांनी दिला होता; तो त्यांच्या कडून काढून घेऊन त्यांनी माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत यांना शके १७०० च्या मार्गशीर्ष वद्य द्वितीयेस दिला ( पशिष्ट क्रमांक २५ पहा ). | याच वर्षी दिवे या गांवी श्री. सवाई माधवरावसाहेब यांनी माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत यांना आणखी साडेवीस बिघे जमीन इनाम करून दिली. मौजे तुळजापूर हा गांव इनाम मिळाल्याचे एक पत्र आढळले आहे; तें वर सांगितलेल्या मोकासा इनामाच्या नंतर दोन दिवसाचे आहे. या वरून असे दिसते कीं, गांव इनाम दिल्याचे पूर्वी ठरले असावे व राजपत्र मात्र व्हावयाचे राहिले असावें. त्या नंतर प्रथम मोकासा इनाम करून त्याचे इनाम पत्र घेतले असावे व मग सबंध गांवचे इनाम पत्र घेतले असावे किंवा हे गांवचे इनाम पत्रवार व्हावयाचे राहिले असावे (परिशिष्ट क्रमांक २६ पहा ). [हे तुळजापूर नगर जिल्ह्यांत आहे. सोलापुराकडे असलेले भवानचे प्रसिद्ध तुळजापुर ते हे नव्हे. ] शके १७१४ साली पानसे यांच्या घराण्यांत ज्यो वृत्ति, जमिनी, पाटील कुळकरणादिक वतने, वाडे, इनाम गांवें वगैरे चालत होती, त्यांची एकत्र यादी आढळली आहे तीः-- १ इनाम जमिनी-मौजे सोनोरी येथील इनाम १ मार्तंडाचा बाग. २ गणपतीचा बाग. ३ पांढरी शेत.. ४ वळतीचे कुरण, ५ मांगदरा. ६ हत्तीचे शेत. ७ पठार.