पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. ७७ १०. कृष्णराव व भिवराव यांच्या वेळी मिळालेल्या कांहीं । इनामांची माहिती शके १६८२ च्या सुमारास माधवराव शिवदेव यांस श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनीं मौजे कासुङ (ता. पुरंदर जि. पुणे ) येथे अर्धा चाहूर जमीन इनाम दिली; परंतु, त्याची राजपत्रे व्हावयाची राहिली होती. ती शके १६८९ मध्ये झाली ( परिशिष्ट क्रमांक २० पहा ). हे पत्र कृष्णराव, भिवराव, व्यंकटराव वगैरेंच्या नांवांचे आहे. मौजे खानवडी (ता. पुरंदर जि. पुणे) येथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी लक्ष्मण चिंतामण धडफळे यांस तीस बिघे जमीन इनाम दिली होती, ती त्यांनी आपले जांवई माधवराव कृष्ण यांस शके १६९५ कार्तिक वद्य पंचमी रोजी आंदण दिली. अद्यापि ही जमीन पानशांकडे चालत आहे. मौजे दिवे येथे पानशांनी पूर्वी कांही जमिनी इनाम मिळविल्या होत्या च. त्यानंतर शके १६९७ फाल्गुन शुद्ध एकादशीस श्री. सवाई माधवरावसाहेब यांनी कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत यांस पंचेचाळीस बिघे नवीन जमीन इनाम दिली. मौजे जेजुरी येथे शके १७०० माघ शुद्ध तृतीयेस माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानसे यांना श्री. सवाई माधवरावसाहेब यांनी सोळा बिघे जमीन इनाम दिली ( परिशिष्ट क्रमांक २१ पहा ). मौजे सावरदरी हा गांव शके १६९७ मध्यें पानशांना इनाम मिळाल्याचे वर सांगितले च आहे. पण त्या गांवचा सरदेशमुखी व पाटिलकीचा हक्क सेनापति दाभाडे यांचा होता. तो शके १६९९ कार्तिक शुद्ध षष्ठीस सगुणाबाई दाभाडे यांनी भिवराव यशवंत यांना वंशपरंपरेनें बहाल करून दिला ( पशिष्ट क्रमांक २२ पहा ). मौजे सावरदरी व मोजे तुळजापूर हीं गांवें पानशांना पूर्वी च इनाम मिळाली होती. मात्र त्यांतील मोकास वाव ही इनाम दिली नव्हती. मोकासा ही बाब खास पेशवे सरकारांची असे व ती वसूल करण्यासाठी, पेशवे हे आपल्या तर्फे एखाद्या सरदारास नेमीत असत. शके १७०० च्या मार्गशीर्ष पौर्णिमेस पुरंदरास माधवराव व भिवराव यांनीं विनंति केल्यावरून, श्री. सवाई माधवरावसाहेब यांनी त्यांना सदर दोन्ही गांवांचा मोकासा हक्क इनाम करून दिला (परिशिष्ट क्रमांक २३ पहा ). याच वेळीं मौजे आळंदी (चोराची ) येथे माघ शुद्ध त्रयोदशीस श्री. सवाई माधवरावसाहेब यांनी माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत यांना अर्धा चाहूर जमीन इनाम दिली. मौजे नाणवली हा गांव महादजी शिंदे यांनी शके १७०० माघ वद्य त्रयोदशी रोज माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत यांस ( सर देशमुखी व मोकासा या हक्कां--