पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ | पानसे घराण्याचा इतिहास. त्या बापूनच स्वहस्ते लिहिल्या किंवा त्यांच्यावर हैं बांलट उभारले गेलें हैं निश्चित करितां येत नाही. या आरोपाबद्दल वापूनी आपल्या बचावाची कोणती बाजू पुढे मांडली हे हि आज पुढे आलेले नाही. यावरून कोणातरी बापूच्या हितशत्रूचे हे कृत्य असावे असा संशय आल्यास तो अनाठायीं नाहीं. बापूचा अंत अखेर कैदेतच झा ला. त्यांच्या शत्रूना अखेर यांतच संतोष न मानतां जारणमारणविद्येच्या प्रयोगाने बापूंच्या चिरंजीवास हि वेड लाविलें. बापूसारख्या थोर शूर व राजकारणपटु मुत्सद्यावर राजद्रोहासारखा भयंकर आरोप येऊन कैदेतच त्याचा अंत व्हावा हा एक दैवदुर्विलसिताचाच प्रकार होय ! ९. भिवराव यांचा मृत्यु ! यानंतर एक दोन महिन्यांनी भिवराव यांची प्रकृति एकाएकी बिघडली. त्यामुळे ते घरीं आराम वाटेल यासाठी सोनोरीस गेले. आठ चार दिवसांतच त्यांची प्रकृति जास्त बिघडून त्यांचा या दुखण्यांत शके १७०० फाल्गुन वद्य सप्तमी उजाडतां सोमवारीं अंत झाला. त्यांचे मागे त्यांची स्त्री उमाबाई या सती गेल्या. भिवराव शूर, मुत्सद्दी व नाना फडणवीस यांच्या बाजूचे होते. शूरांची योग्यता शूर च जाणतो. भिवरावांबद्दल प्रसिद्ध योद्धे परशुरामभाऊ पटवर्धन म्हणतात, “भिवराव कर्ता माणूस. यंदा इंग्रजांचे लढाईत फार च मेहनत त्यांनी केली होती. तसा मनुष्य होणे दुस्तर, श्रीच्या इच्छेस इलाज नाहीं. भिवराव बहुत थोर, शहाणे, एकनिष्ठ, साल मजकुरी व गुदस्तां व तोतयाचे मसलतींत बहुत च मेहनत केली होती. गुदस्तां बहुत प्रकारें नानांच्या मसलतीस उपयोगी पडले. पुढे हि निष्ठेनेच सेवा करावी असे माणूस. परंतु, आयुष्यमर्यादा पुरली त्यास इलाज नाही. मोठी धूर च या काळांत गेली. तोफखान्याचा बंदोबस्त चांगला राखीत होते ' ( ऐ. ले. सं. ३४०२ ). यांत भिवराव यांच्या सर्व चरित्राचे सार आले आहे असे आम्हांस वाटते. आम्ही ते सांगण्यापेक्षा तत्कालीन एका प्रसिद्ध युद्धकुशल पुरुषाने जे सांगितले आहे ते त्यांच्याच शब्दांत आम्हीं वर दिले आहे. त्यावरून मराठी राज्यघटनेच्या कामी भिवराव यांनी काय किंमतीची कामगिरी केली हे सुज्ञ वाचकांच्या सहज च लक्षांत येईल.*

  • भिवराव वारले त्या वेळी त्यांच्या नांवें ३९२७५८१४ रुपयांचा सरंजाम चालत होता. तळेगांवच्या लढाईतील त्यांचे शौर्य पाहून पेशव्यांनी त्यांना चौघडा व जरी पटक्याचा मान दिला. तसेच जुन्या एका पत्रांत ( शके १७०० कार्तिक वद्य सप्तमाच) त्यांना फौजेच्या खर्चासाठी नव्वद हजारांचा सरंजाम दिला असा उल्लेख आहे. । । भिवराव यांना लहान मोठे मिळून, जयवंतराव, सखारामपंत, विश्वासराव पुरुषोत्तमपंत व कृष्णराव असे पांच बंधु होते. भिवराव यांस संतति झाली नाही, म्हणून त्यांनी आपला पुतण्या नीलकंठराव जयवंत यास दत्तक घेतले होते. नीलकंठराव हे शके १७१२ त वारले. यांना पोटी पुत्रसंतान कांहीं च नव्हते.