पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवे. ७५ लागले. ही चाहूल, छबिन्यास ( पेशवे ) सरकारची फौज होती, त्यांस समजले आणि मागें लागौन गेले....( बाकीच्या हि ) फौजा धांवून गेल्या. तेव्हां छकडे वगैरे सांपडले...... तळेगांवानजीक वडगांव आहे. तेथे दोन तीन पलटणे दिवस उगवतां गांठ पडली. सरकारच्या तोफा लाविल्या. तोफा त्यांज ( इंग्रजां ) कडील बंद केल्या...ते निघोन गेले (पळाले)...इंग्रजांचा मोड जाहला. चार पांचशे माणूस मारिलें. पांच तोफा व दोन गरनाळा सरकारांत पाडाव आणिल्या. शिवाय दोन हजार बंदुका वगैरे लूट सांपडली. घाटाखाली, खोपवलीस ( इंग्रजाची ) फौज बसली....इंग्रजांची रस्त मनाकेली,” ( ऐ. ले. सं. पृ. ३३८० ते ३३९७ ). याचा सारांश असा कीं, इष्टूरची व भिवरावांची लढाई झाली, तेव्हां इष्टूरच्या मदतीसाठी सारे इंग्रजी लष्कर घाटचढून वर आले. त्यामुळे शिंदे होळकर व उभयतां कारभारी व हरिपंत तात्या वानवडीस होते ते हि तळेगांवच्या रोखें आले. पानशांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली. ते लढत असतां खंडाळे येथे,. ले. क. के. हा त्यांचा बाण लागून जखमी झाला व कारले येथे पानशांच्या सबसिकल या तोफेचा गोळा लागून इष्टूर फाकड़ा (कॅप्टन स्टूअर्ट ) पौष वद्य द्वितीयेस ठार झाला. अशी स्थिति पाहून, पूर्वी ठरल्या प्रमाणे, तुकोजी होळकराने श्री. दादासाहेबांना येऊन मिळण्याचे टाळलें, चिंतो विठ्ठलाच्या म्हणण्या प्रमाणे आणखी जी कांहीं इतर फौज इंग्रजांना मिळणार होती ती हि मिळाली नाही. इंग्रज तळेगांवास पळाला. तेथे पाटिल बाबांनी त्याच्यावर हल्ला केला व त्याला धुडकावून दिले. तेव्हां पौष वद्य सप्तमीच्या रात्री इंग्रज तळेगांवाहून पळून मुंबईस निघाला. तेव्हां सर्व मराठी फौजा त्याला बिलगल्या. इंग्रज वडगांवाकडे निघाला. वडगांव गांठण्यास त्याला दुसरा दिवस लागला. मराठ्यांनी त्याला तेथे घेरून कोंडले. अखेरीस मराठे म्हणतील त्या अटींवर तह करणे इंग्रजांना भाग पडले. महादजी शिंद्यांच्या मार्फत तह झाला. या तहांतील शर्तीप्रमाणे श्री. दादासाहेब आपण होऊन तेरा तीफा व बारा तेराशें गारद्यांसह पाटीलबाबांच्या गोटांत माघ शुद्ध प्रतिपदेस येऊन उतरले. या. लढाईत पानशांच्या हातांखालीं तोफखान्यावर मुसा नाराज व नरोन्हा या नांवाचे. दोन फ्रेंच अंमलदार होते, पैकीं नरोन्हा जखमी झाला. | या प्रकरणांत आणखी एका बड्या धेडास पेंचांत आणून नाना फडणीस यांनी सर्व राज्यकारभार निष्कंटक करून आपल्या हातांत आणला. इंग्रज घाट चढून आला, त्या वेळी धोंडभट ब जोतीभट या उभयतांनीं कांहीं फितुरीच्या चिठ्या मृदंगांत घालून चालविल्या असतां त्या पानसे यांनी पकडून पाटीलबोवांच्या स्वाधीन केल्या. त्या चिठ्या सखाराम बापूंनी श्री. दादासाहेब व चिंतो विठ्ठल यांजकडेस फितुरी करण्याकरितां आपल्या स्वदस्तुरच्या पाठविल्या असा बापूवर आरोप होता. त्या चिठ्या बजिन्नसच पाटीलबावांनीं बापूच्यापुढे टाकल्या व या फितुरीच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तेथेच कैद करून सिंहगडास रवाना केले. त्या चिठ्या आज उपलब्ध नाहीत. यामुळे