पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ पानसे घराण्याचा इतिहास. मुंबईच्या बातम्या प्रत्यहीं नानांना कळत असत. शके १७०० च्या मार्गशीर्षांत इंग्रजांची चार हजार फौज मुंबईहून निघाली. तेव्हां, नानांनी कर्नाटकांत मोहीम करण्याचे रहित केले. इंग्रजांबरोबर श्री. दादासाहेव, अमृतराव ( दत्तक पुत्र ) व दिवाण चिंतो विठ्ठल है, दोन तीन हजार फौज आणि तोफखाना घेऊन निघाले होते. यांच्याजवळ बाजारबुणग्यांचे एवढे लटांबर होते की, ते घेऊन बोरघाटाच्या माथ्यावर येण्यास त्यांना पक्का एक महिना लागला. तेवढ्या अवधींत पुण्यास मराठी फौज तयार झाली. इतक्यांत इंग्रजांची विनी घेऊन इटूर फांकडा घाट चढून वर आल्याची बातमी आली. तेव्हां, त्याचा मुकाबला येण्यास इकडून सात तोफा चार हजार पायदळ व पाच हजार घोडदळ यांसह भिवराव पानसे यांना तोंडावर पाठविलें * बोरघाटावर खंडाळे म्हणून तळे आहे. तेथे पांच हजार गारद व पांच तोफा याप्रमाणे (इंग्रजांचा ) सरंजाम आला आहे” या नंतरची हकीकत पुढील प्रमाणे घडली * पानसे व बाजीपंत अण्णा वगैरे फौज तळेगांवावर पाठविली आहे ......इंग्रजांनी तळे किल्ला आहे त्यास मोर्चे दिले होते. ऐशास गांवांतून लेक मोर्चावर पडून मारामारी केली. दीडशे माणूस कापून काढले. दोन तोफा व जेजाला वीस पाडाव केल्या. मौर्चे गेले... ...भिवराव पानसे यांनी...... इंग्रजांवर चालून जाऊन तोफेचे गोळे व बाण टाकिले. तेव्हां, ते हि तयार होऊन येऊ लागले; तेव्हा यांनी मागती मागिरी करून ( त्यांना ) मागें सारिलें. इष्टर फांकडा इकडील तोफेचा कारल्याच्या मुकाम गोळा लागून ठार जाहला .....कर्नल की वाण लागून जेर जाहला......श्री. दादासाहेब लकडकोट घालून बातेच्या बांधोन अडचणीच्या जागेत राहिले.......राजश्री भिवराव पानसे व बाजीपंत अण्णा सडी फौज व तोफा ( खाना ) घेऊन गेले. तलावावरून पहिल्या दिवशीं तोफा लाविल्या. तोफातोफांची लढाई झाली. दुसरे दिवशीं ज्या जागेवर पानसे यांनी तोफा लावल्या होत्या, तेथे त्यांचे ( इंग्रजांचे ) सामान, जागा, धरून राहुट्या देऊन राहिले. पानसे दुसरे दिवशी गेले, तोफा लाविल्या तेव्हां ते ( इंग्रज ) वाटोन ( पुढे चालून ) आले.......तिसरे दिवशी लांब पल्याच्या तोफा नेऊन लागू केल्या...( इंग्रजांच्या ) राहुट्यांवर मार दिला...इंग्रजांनी राहुट्या काढल्या, त्याजकडील जायां जखमी जाहले........पानसे यांजपासून घाट तीन कोस आहे. पानसे यांजजवळ पांच हजार फौज जमली; कारभारी यांजजवळ उभयतां ( शिंदे होळकर ) सरदार सुद्धा वीस हजार फौज आहे. घाटाखाली वसि हजार फौज रवाना जाहली. दुरोखें शह त्यांस ( इंग्रजास ) बसेल. श्रीमंतांच्या पुण्यप्रतापें दुष्टाचे पारिपत्य होईल. हिंदुस्थानचे इंग्रज.......हुसंगाबादेकडे अलीकडे दोन तीन मजली अलीकडे आले......शुक्रवारी ( पौष वद्य ) पष्टीस श्री. दादासाहेब इंग्रज सुद्धा तळेगांवावर आले......रविवारपर्यंत तळेगांवीं च होते. सोमवारी रात्रीस दादासाहेब व इंग्रज पांच पलटणे सुद्धा निघोन माघारे गेले. त्यांच्या मागें तीन पलटणे व बुणगे जाऊं