पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ प्रकरण पांचवे. तेव्हां, कारभा-यांना पंचाईत पडली व भाऊंना त्यांनी निरा नदीच्या आसपास तळ देण्यास व कांहीं दिवस तेथेच थांबण्यास सांगितले. - या वेळी भिवराव पानसे यांना पाठवावे व भाऊंना ठेवून घ्यावे असा बापूंचा बेत होता. भिवराव हे कदाचित् , बापूचा व त्यांचा स्नेह असल्यामुळे बापूच्या जाळ्यांत अडकले जाण्याचा संभव आहे असे नानाच्या मनास वाटून त्याने भाऊंना सांगितले की, “ भिवराव पानसे यांस पाठवावें तर फौज ( आपल्या ) लगामींची जाते हैं ठीक नाहीं. आज पावेतों जे केले त्याचे सार्थक तुम्हीं निघाल्यास होते " (कित्ता ३३४३ ). तेव्हां अखेर भाऊ * बरोबर तोफखाना नेमिला......तो मुहूर्ताने सासवडाहून येखदपुरास आला......समागमें पानसे राजश्री राजबा ( पुरुषोत्तमपंत ) येणार " ( कित्ता ३३६२ ). त्याप्रमाणे ते भाऊंच्या बरोबर निघाले. ८. वडगांवची लढाई व भिवराव पानसे. | इंग्रजांनी या सुमारास मुंबईस फौजा जमा केल्याची व पुण्यावर चालून येऊन दादासाहेबांना पेशवाईच्या गादीवर बसविण्याची तयारी चालविली होती. मध्यंतरीं इंग्रजांनी दादासाहेबांचा पक्ष सोडावा म्हणून पुणे सरकारने त्यांस दहशत बसण्यासाठी फ्रेंचांशीं राजकारण करण्याचा डौल घातला. पण, त्यामुळे इंग्रजांना वाटले की, मराठ्यांनी आपल्याला मुंबईहून हकलण्यासाठी ही खटपट चालविली आहे. तेव्हां ती सिद्धीस जाण्यापूर्वीच आपण दादासाहेबांना गादीवर बसवून मराठी दरबार आपल्या हातांत आणावा. पूर्वी, या बेतास गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिग्ज हा विरुद्ध होता. पण, मुंबईकर इंग्रजांनी त्याच्या मनांत वरील भीति भरवून दिल्याने त्याने हि या मसलतीस आपली परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर त्याने बुंदेलखंड, माळवा, नेमाड या मार्गाने मुंबईकरांच्या कुमकेस सहा पलटणे रवाना केली. पण या वेळी इंग्रजांना काळ अनुकूल झाला नाही. कारण, त्यांचा असा धावडाव चालू असल्याच्या बातम्या शके १७०० च्या पावसाळ्याचे अगोदर च नानांना समजल्या होत्या व इंग्रजांना बोलावणाच्या मोरोबादि मंडळींना त्यांनी कैदेत टाकून बरीचशी परिस्थिति आपल्या कह्यांत आणून ठेविली होती. तत्रापि, दादासाहेबांचे पक्षपाती चिंतो विठ्ठल वगैरेंनी राज्यांत बंडे उठविली. खुद्द तुकोजी होळकर हा हि आंतून दादासाहेबांना फितूर होता. बोरघाट चढून दादासाहेब वर आले म्हणजे, आपण तुम्हांस मिळू, असे त्याने त्यांना कळविले होते. - हे सर्व साधले असते तर, दादासाहेबांचा बेत सिद्धीस जाता हि पण, इंग्रजांची मुंबईची व कलकत्त्याची फौज एकत्र झाली नाही. शिवाय कोल्हापूरकर, सुरापूरकर, शिवनेरकर वगैरे बंडखेारांचा बंदोबस्त ताबडतोब केल्यामुळे अधिकारपदारूढ पेशव्यावर उठलेले हे एवढे प्रचंड काहूर नानांच्या मुत्सद्दीपणाने अवघ्या एक दोन महिन्यांत वितळून गेले.