पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ पानसे घराण्याचा इतिहास. राजश्री उभयतां ( बापू व नाना ) एकत्र झाले. गुंता राहिला नाहीं. लौकर क्रिया( पुरंदर ) समीप यावे. तुम्ही हरिपंततात्यांस घास दाणा उकळीत बसतां हें ठीक न केलेत. लौकर तात्यांस मिळून त्यांचे मर्जीप्रमाणे वर्तणूक करावी, म्हणोन दोन चिठ्या राजश्री ( सखाराम ) वापू पानसे यांस भिवराव यांच्या आल्या. जवळ्यावर राजश्री बापू पानसे यांची भेट झाली. चिट्या पाहिल्या. आमचे व ( बापू ) पानसे यांचे बोलणे झाले.” ( त्यांत बापूंनी भिवराव यांस पुण्याकडलि खरी बातमी काढण्यासाठी जें पत्र लिहिले होते त्यांतील जो पुढील मजकूर होता तो भाऊस सांगितला. ) बापूंनी, भिवरावास लिहिले की, “ तुमच्या चिठया आल्या. हे काय करितां ? रोज एक करितां. सारें राज्य बुडालें. मी घरी ( सोनोरीस ) जाणार होतो, परंतु तुम्ही राजश्री हरिपंततात्यांस लिहिलें यास्तव आलों ( ख. ऐ. ले. सं. ३२६६ ). यावरून भिवराव व सखारामपंत यांची नाना फडणिसांच्या ठिकाणी निष्ठा व त्याबरोबर च श्री. सवाई माधवराव साहेब यांच्या विषयांचा आदर ही स्पष्ट दृग्गोचर होतात. भिवराव हे इकडे ते व सखारामपंत हे मागें हरिपंत तात्यांच्या सैन्यांत कर्नाटकांत राहिले होते. तात्या जेव्हां कर्नाटकांतून परतले, तेव्हां सखारामपंत हि परत आले. जवळे गांवी त्यांचा मुक्काम असतां, भिवरावांनी पुण्याकडील ही सारी हकिकत सखारामपंतांस व त्यांच्या तर्फे तात्या व भाऊ यांना कळविली. मोरोवाशी नानांनीं समेट केल्यामुळे सखारामपंत पानसे रागावले व त्या भरांत त्यांनी भिवरावांस * रोज एक करितां राज्य सारे बुडालें' असे शब्द लिहिले होते. या हकीकती शके १७०० च्या वैशाखांतील झाल्या वर सांगितल्याप्रमाणे दिव्याच्या घाटाजवळ पाटिलबावा व सखाराम बापू यांची भेट झाली, व तात्पुरता समेट झाला. या वेळी * ( भिवराव ) पानशांच्या मार्फतीने बोलणे होतेच. तोच संकेत धरून येथ पावेतों आलों” म्हणून हरिपंततात्यांनी बापू व पाटीलबावा यांस सांगितलें ( कित्ता ३२८१ ) होते. | हा तात्पुरता समेट होता, असें वर म्हटले आहे ते खरे होते. कारण मोरोबा फडणिसांस क्षमा करण्यांत आली खरी, पण ते स्वस्थ बसून नव्हते. त्यांच्या कटांतील पुष्कळांना निरनिराळ्या शिक्षा सरंकारांतून दिल्या गेल्याने ते चिडले व पुन्हा फितुरी चाळे करू लागले. तेव्हां नानांनी त्यांस धरून आणून गुलटेकडी वर कैदेत ठेविलें व तेथून त्यास नगरचे किल्यांत रवाना केले. तेथे ते बावीस वर्षे कैदेत होते. हरिपंत तात्या व परशुरामभाऊ हे परत पुण्याकडे आल्यावर हैदरास कर्नाटकांत मोकळे रान सांपडले. तेव्हां, तुंगभद्रा पार होऊन त्याने थेट मलप्रभेपर्यंतचा प्रांत काबीज केला. एवढेच नव्हे तर त्याने तेरदाळ, जमखंडी व यादवाड ही ठाणी घेऊन धारवाड हि हस्तगत केले. तेव्हां, त्याच्यावर जाण्यासाठी कारभा-यांनी परशुरामभाऊ व भिवराव पानसे यांना पाठविण्याचे ठरविले. इकडे करवीरकरांनी बंडाळी चालविली व तशांत इंग्रज ज जमविल्याची बातमी हि येऊन थडकली