पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. ७१ पानसे, नरसिंगराव धायगुडे, मालोजी नाईक निंबाळकर व खंडेराव दरेकर यांचे तीन चार गोट लगत होते ते हि लुटले ( पौष शुद्ध दशमीच्या पूर्वी ). इकडे कोल्हापुरकरांनी ही साध साधून पुन्हा बंडाळी चालविली, तेव्हा त्यांच्यावर पेशव्यांनी महादजी शिंदे यांना पाठविले. त्यावेळी पुण्याच्या सरकारी मोठमोठ्या तोफा ( महांकाळीसारख्या ) पाटीलवावांनी नेऊन कोल्हापुरकरांशी लढाया देऊन त्यांना नामोहरम केले. “ सरकारांतून महांकाळी तोफ शिंद्याकडे रवाना जाली. ” ( ऐ. ले. सं. ३१४४ ). ही हकीकत शके १६९९ च्या फाल्गुनांतील होय. वास्तविक कोल्हापुरकरांस बंडाळी करण्यास उत्तेजन हैदर व दादासाहेबांचे पक्षपाती मोरोवा फडणीस वगैरे मंडळींकडून मिळाले. मोरोबाने तर या वेळी फार मोठा व्यूह रचला होता. त्याने होळकरांस फोडले. कर्नाटकांतील परशुरामभाऊ व हरिपंत तात्या यांच्या फौजेत असलेले नरसिंगराव धायगुडे यांना हि फोडून त्यांच्या मार्फत फौजेंत हि फतुरी केली. इतकेच नव्हे तर, खुद्द सखाराम बापूस हि वळविण्याचा प्रयत्न करण्यास कमी केले नाही. बापूचे सर्वसामान्य धोरण नेहमी धूर्ततेचे असे. विरुद्ध पक्षांत आपसांत कलह, लावून द्यावयाचा व मग त्यांतील प्रत्येक पक्षाला आपली गरज लागेल असे करावयाचे. बापू हा ** खेळ्या होता, तेव्हा या कारस्थानांत * वृद्धाचे हि खेळ आहेत " ( कित्ता ३१६६ ) असे त्यावेळी लोकमत बाहेर आले होते. नाना मात्र सरदार व संस्थानिकांकडून आंतून पैसे घेऊन गबर होत व बाहेरून एक च पक्ष धरल्याचा वाणा बाळगण्याचा आव आणत. पेशवाईवरील या प्रसंगाची बातमी कर्नाटकांत समजली त्यावरून तात्या व भाऊ यांनी पानावर पान ठेवून, हैदरावरील या स्वारीचा शेवट लाविला व ते तत्काळ परत पुण्याकडे वळले. तसेच पाटीलवावांनी हि केल्हिापुरकरांस तंबी देऊन त्यांना गप्प बसविले आणि आपण नानांना सर्व प्रकारे सहाय्य करण्याचे ठरविले व तसे त्यास कळविले. पण नानांनी एकंदर परिस्थिति पाहून मोरोबाशी कांहीं अटींवर समेट केला आणि इंग्रजांस घेऊन दादासाहेब जे पुण्यास येऊन पेशवाईचे गादीवर बसणार होते, ते कांहीं दिवस लांबणीवर पाडले. या वेळचे मोरोबांचे व बापूंचे कारस्थान इतकें बिकट होते की, त्यावेळी त्यांना * आपल्या वस्त्राचा देखील विश्वास ( राहिला ) नाहीं. " या एकंदर गोष्टी शके १७०० च्या चैत्र वैशाखांतल्या होत. या वेळी पाटीलबावांना भेटण्यासाठीं बापूंनी मोरोबास सापें घाटांत नेलें होतें: त्यांच्या बरोबर तेव्हां इतर जी मंडळी होती तींत अप्पा बळवंत, रामचंद्र गणेश, भिवराव पानसे वगैरे सरदार लोक होते. भिवराव हे बहुधा नानांच्या च बाजूस चिकटून असत. ज्यावेळी नाना व बापू यांच्यांत समेट झाला, तेव्हां भिवराव यांनी ती बातमी सखारामपंत पानसे यांस व त्यांनी परशुरामभाऊस कळविली. भाऊ म्हणतात की, “ तोफखान्याच्या गृहस्थाची चिठी आली त्यांतील भाव ‘ निःसंदेह