पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३।। ७० पानसे घराण्याचा इतिहास. . या वर्षी, भिवराव यांस परगणे सुतोडा सरकार दौलताबाद याचा दहा हजारांचा जहागीर अंमल पेशवे सरकारांनीं, राऊतांचे सरंजामासाठी लावून दिला. हा अंमल प्रथम कबीर महंमद खान याच्याकडे होता. पण, सदर प्रांत, ज्यावेळी निझामाची साठ लक्षांची जहागीर पेशव्यांना मिळाली, त्यावेळी तींत आला होता, त्यांतील त्यांनी पानशांना सदरचा अंमल लावून दिला ( परिशिष्ट क्रमांक १९ पहा ). ७. हैदरअल्लीवरील मोहिमेवर भिवरावांची नेमणूक मागे सांगितल्याप्रमाणें हैदरावर हरिपंततात्या हे हुजुरात घेऊन गेले होते. तत्पूर्वी परशुरामभाऊ हि तिकडे च होते. परंतु बरसातीमुळे पेशव्यांची ही फौज कर्नाटकांत अडकून पडली. पावसाळ्यानंतर तात्या व भाऊ यांनी या हैदरावरील पांचव्या स्वारीस प्रारंभ केला ( कार्तिक शके १६९९ ). या वेळी निझामाची हि ससैन्य मदत मराट्यांना होती. प्रथम हुलकावण्या दाखवीत दाखवीत मराठ्यांनी हैदराला डोंगराळ मुलखांतून बाहेर काढून मैदानांत आणिलें. हैदर हा नेहमी अडचणीच्या जागी राहून मराठ्यांना त्रास देत असे, आणि अशानें मैदानांत येऊन तोंड देण्याचे टाळत असे. मराठ्यांचा तळ या वेळी रारावी येथे व हैदर याचा दरोजी येथे होता. दोघांत अंतर चवदा कोसांचे होते. मराठे या वेळी स्वस्थ न बसतां भोंवतालच्या प्रांतांतून खंडण्या गोळा करण्याचे काम करीत होते. अनागोंदीचा संस्थानिक हैदराच्या सूत्राने चालत होता व त्याच्या जोरावर तो मराठ्यांना खंडणी देत नव्हता. सबब त्याचे कंपली हैं। जबरदस्त ठाणे घेण्याचे काम सखारामपंत पानसे यांच्याकडे सोपविण्यांत आले. * अनागोंदीची खंडणी झाली पाहिजे, यास्तव सखारामपंत पानसे यांस पाठवून कंपलीस तोफा लाविल्या आहेत. त्यास जावसालास वकील येणार म्हणोन रदबदल केल्यावरोन तोफा मना केल्या ' ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ). पुढे सखारामपंत हे भाऊंच्या फौजेसह पुढे निघाले. * माग बल्लारीकरांचा एक गांव ( ठाणे ) होता. तो चढ्या घोड्यानिशी दोन घटकांत हल्ला करून तोफांच्या मान्यांनी घेतला. आंत हैदरखानाचे प्यादे होते ते कापून काढले " ( ख. ऐ. ले. सं. ३०८९ ). पांचव्या स्वारींतील या व पुढच्या लढायांत पानशांचा तोफखाना चांगलाच उपयोगी पडला. कारण, हैदराजवळ मोठमोठ्या अशा पंधरा तोफा होत्या. त्यासाठी पानशांनी हि दोन ( मोठ्या ) तोफा मुतलावीस होत्या त्या आणविल्या. या तोफांची नांवें सत्य. शकल व फत्तेजंग अशी होती ( कित्ता ३१५८ ). या सुमारास मराठ्यांच्या सैन्यांत मानाजी शिंदे ( फांकडे ) हा सरदार होता. त्याचा ओढा पूर्वीपासून दादासाहेबांच्याकडे होता. त्यामुळे या संधींत दादासाहेबांचे जे हस्तक हैदराकडे होते त्यांनी त्याला फोडले. हैदराने मानाजीस पुष्कळसे होन पाठविले होते, त्यांपैकीं पाऊण लाख होन भाऊंनी पकडले व फितुरीचा कागद हि धरला. तेव्हां त्याच्या गोटावर भाऊंनी हल्ला केला, पण खासा मानाजी पळून गेला. या मडबडींत मानाजीनें तोफखाना