पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवे. त्यांस वर्तमान सांगितले. त्यांणीं च ती पत्रे ऐन जिनसी भिवराव यांजकडे पाठविलीं. नववे दिवशी चिमाप्पास कळले. तसच पत्रं सोनोरीस गेली. आम्ही चिमाप्पाच्या घरी गेलो होतो. एक दोन दिवसांत सोनोरीस जातो. चिमाप्पा आज च ( ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ) सोनोरीस गेले ' ( कित्ता २९५४ ). या पत्रावरून कृष्णरावांची योग्यता पुण्यास सरकार दरबारी केवढी होती हे स्पष्ट ठरते. त्याबद्दल आणखी विशेष सांग‘ण्याची गरज नाहीं. डंबळकर देसायाकडून कृष्णराव पानसे यांच्या कुटुंबास जो ५०० रुपये उत्पज्ञाचा गांव इनाम मिळणार होता म्हणून वर आले आहे, तो गांव रामभाऊंच्या विद्यमानें देसायाने, कृष्णराव यांचे चिरंजीव माधवराव व श्रीपतराव यांस देण्याचे कबूल केले. पुढे सदरचा गांव गंगापूर ( जि. धारवाड ) शके १७१४-१७१५ च्या सुमारास प्रत्यक्ष इनाम मिळाला ( परिशिष्ट क्रमांक १६ पहा ). ६. शके १६९८-९९ मधील कांहीं गोष्टी. या सुमारास कोल्हापुरकरांनी हि उपद्रव दिल्यामुळे त्यांच्यावर पेशवेसरकारांनी महादजी शिंदे यांना पाठविले. पाटीलबावांच्या मदतीस पानशांचा तोफखाना होता व त्याच्या जोरावरच त्यांनी कोल्हापुरकरांस शरण येण्यास भाग पाडले. प्रसिद्ध महांकाळी तोफ, ही टेंबलाईच्या माळावरून सुरू करण्यांत आली होती. त्यामुळे तटास भगदाडे पडली व गांवांत फार नुकसान झाले. तेव्हां पाटीलबावांनी सांगितलेल्या सर्व अटी कोल्हापुरकर महाराजांनी कबूल केल्या. कृष्णरावांच्या पतनानंतर शके १६९९ मध्ये पेशवे सरकारांनी सोनोरी हा गांव माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानसे यास ( मोकास अमलाखेरीज ) कुलबाब, कुलकानूंसह इनाम करून दिला ( परिशिष्ट क्रमांक १७ पहा ). याच सुमारास मौजे सावरदरी हा गांव हि दाभाडे यांनी भिवराव यास इनाम दिला. छत्रपतींनी व पेशव्यांनी हि तो गांव करार करून दिला ( परिशिष्ट क्रमांक १८ पहा ), | श्रावण मासांतील दक्षिणा जेव्हां पर्वतीच्या रमण्यांत वांटीत असत, तेव्हां निरनिराळ्या दरवाजावर निरनिराळे प्रमुख सरदार बसवीत व त्यांच्या हस्ते दक्षिणा वांटीत. खुद्द पेशवे सरकार या कृत्यास प्रारंभ करून देत व थोडा वेळ दक्षिणा वांटून मग परत जात. मागाहून त्यांचे सरदार पुढील दक्षिणा वाटण्याचे काम पुरे करीत शके १६९९ च्या श्रावणांत, शुद्ध षष्ठी, शनिवार, सकाळीं दीड प्रहरास दाक्षिणा वांटण्यास प्रारंभ झाला. रमण्यास एकंदर पांच दरवाजे होते. त्यांपैकी पांचवा दरवाजा भिवराव यशवंत पानसे यांच्याकडे होता. त्यांच्या विद्यमाने तेथे जी दक्षिणा वाटली ती ४१८९ रु. असून, ती १९२२ माणसांस वाटण्यांत आली होती ( स. मा. रो, भा. ३ पृ. १९७ ).