पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ पानसे घराण्याचा इतिहास. भाऊंनी प्रथम डंबळकर देसायावर रोख धरला; त्यांनी गदगचे ठाणे व पन्नासा हजार रुपये खंडणी घेऊन त्याच्याशी समेट करण्याचा बेत केला होता, व देसाई हि त्याला प्रथम कबूल झाला. परंतु तात्यांची फौज निझामाकडे गेल्याचे पाहून तो बदलला, तेव्हां भाऊंनी त्याची हरलापूर, उमंचगी वगैरे ठाणी घेतली आणि खंडणी हिः वसूल केली. नंतर, त्याचे हिरेहाळ नांवाचे मजबूत ठाणे होते, त्यास वेढा घातला. पंधरा दिवस निकराची लढाई झाली. या वेळी “ यादवाडाहून व मुदलावीहून दोन दोन तोफा " आणल्या होत्या ( कित्ता २९२९ ). तसेच एक “ मेंढा तोफ सावशीचे लढाईपासून नरगुंदास च आजपर्यंत होती......ती उदईक येथे ( डंबळः नजीक ) येईल असे भाऊ एका पत्रांत लिहितात ( किक्त २९३६ ). हिरेहाळचे ** ठाणे जबरदस्त च आहे. गांवास तोफा लाविल्या आहेत. मोर्चे हि कायम केले. आहेत. परंतु, बाहेर आसरा कांहीं च नाहीं. याजमुळे मोर्चे लवकर चालत नाहींत. अशी लढाई चालू असतां हि डंबळकर हा एकीकडे तहाची वाटाघाट करीत च होता. * मोर्चे देऊन आज आठ दिवस झाले अद्याप गांव आयास ( जेरीस ) आला नाही." या आठ दिवसांतील लढाईत एके दिवशीं कृष्णराव पानसे हे एका हल्लयांत कपाळास गोळी लागून कामास आले. * कृष्णरावासारखा माणूस या खेड्यावर पडला, तेव्हां. गांव घेऊन सरकारचे ठाणे च वसवावे असे आहे. याप्रमाणे, कृष्णरावांविषयी परशुरामभाऊंचे प्रेम व आदर हीं होती. हे पत्र वैशाख वद्य तृतीयेचे ( शके १६९९ ) आहे. म्हणजे त्या तिथीपूर्वी कृष्णराव हे मृत्यु पावले ( कित्ता २९४० ).. भाऊ आणखी एके ठिकाणी म्हणतात की, * कृष्णरावासारखा सरदार येथे हिरेहाळावर पडला, वाईट गोष्ट जहाली. काल ( वैशाख वद्य त्रयोदशी ) पासून डेवळकराकडून बोलणे लागले आहे की, चार रुपये अधिक उणे माथी मारावे, परंतु हिरेहाळचे मोर्चे उठवावे. कृष्णराव येथे पडले, तेव्हां आमचे मते गांव कापून च काढावा असे आहे ? | ( कित्ता २९४७). सारांश, कृष्णराव गेल्याने सरकारचा एक फार मोठा व शूर सरदार नाहीसा झाला व बहुत नुकसान झाले, हे यावरून उघड दिसते. तिसरे दिवशी म्हणजे अमावास्येस गांव भाऊंच्या हाती पडला. त्या लढाईत जनोबा पटवर्धन यांना खांद्यावर बंदुकीची गोळी लागली. ऐशी हजार खंडणी घेऊन तह झाला.. शिवाय * कृष्णराव पानसे येथे पडले, त्यांच्या कुटुंबाकडे ५०० रुपयांचा गांव, (डंबळकर ) संस्थानिकांनी इनाम चालवावा असे ठरले ( कित्ता ). पुण्याचा पटवर्धनांचा वकील म्हणतो की, “ कृष्णराव पानसे यांसी गोळी कपाळास लागून ठार जाहले म्हणोन लिहिल्यावरून बहुत च खेद जहाला ! कृष्णराव यासारखा मनुष्य होणे नाहीं; त्यांचे भाऊबंध आहेत, परंतु त्यांची गोष्ट दुसरी. त्यांचे साम्यतेस जोडावीशी नाही. राजश्री भीवराव चांगले आहेत. वरकड भाऊबंद पुढे निभावयाचे आहेत. होणारास उपाय नाहीं. थोरल्या महार्णवां ( सावशीच्या लढाई ) तून वांचले. खेड्यावर अशी गोष्ट जहाली. उपाय नाहीं......राजश्री चिमाप्पा पानसे पुण्यांत च होते,