पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवे. ६७ मुतलावीस आले. ही बातमी समजतां च परशुरामभाऊ कर्नाटकांत तांतडीने उतरले. त्यांना मदत करण्यासाठी सरकाराने पुण्याहून धायगुडे व मेहेंदळे यांची फौजेनिशीं रवानगी केली. | सावशीच्या लढाईत मराठ्यांच्या “ बरोबर ( सायम ) तोफा दोन लहान होत्या ......कुमदानच्या पांच सात तोफा होत्या......( मराठ्यांनी ), दोन तोफा सुरू केल्या, परंतु, त्या लागू झाल्या नाहीत......पल्लेदार तोफा गोटांतील आणविल्या ( परंतु )......त्या तोफा जाऊन पोहोचल्या नाहीत. थोर तोफा असत्या तर कामगिरी होती ” ( कित्ता २७८७-२७८८ ) याप्रमाणे या लढाईत उतावळी फार झाली. या युद्धांत * आनंदराव माधव ( पानसे ) तोफखान्याकडील” हे हि हजर होते ( कित्ता २७८९ ). या वेळी कुमदानाने पेशव्यांकडील तोफखान्यांतील एक नौबत व अंबारीसह तीन हत्ती व सात तोफा काबीज केल्या. ५. कृष्णरावांचे धारातीर्थी पतन ! कुमदानाने धारवाडच्या किल्लयास वेढा दिला व मराठ्यांचे ते नाक्याचे बळकट ठिकाण काबीज करण्याचा उद्योग आरंभिला. याच दिवशी परशुरामभाऊ पटवर्धन हे कोल्हापुराकडून येऊन मनोळीस दाखल झाले होते. मनोळी व धारवाड यांत चवदा कोसांचे अंतर आहे. भाऊंनी लगेच गनिमी लढाया सुरू केल्यामुळे कुमदानाने धारवाडचा वेढा उठवून तो हुबळीस जाऊन राहिला. एकट्या भाऊंनी त्याला तोंड देण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी पुण्यास मदतीची मागणी केली व त्यावरून धायगुडे, फांकडे वगैरे सरदारांस भाऊंचे मदतीस पाठविण्यांत आले; हे मागे सांगितलें च आहे. ती मदत येईपर्यंत भाऊंनी मनोळी सोडून सौंदत्तीस छावणी केली. त्यानंतर खुद्द हरिपंततात्या पुण्याहून निघाले. “ तात्या समागमें चार तोफा आहेत व तोफखान्यावरचे सखारामपंत पानसे हि समागमें आहेत " ( फाल्गुन शके १६९८, ख. ऐ. ले. सं. २९०७). कुमदान व करवीरकर यांनी एकत्र मिळून थेट पुण्यावर येऊन दादासाहेबांना गादीवर वसवावे असे हे एक त्यांचे मोठे कारस्थान होते, पण ते वर सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या कर्नाटकांत जाण्याच्या योगाने विसकटलें. तत्रापि या वेळीं हैदरास, कितूर, नवलगुंद, डंबळ, हाळीहाळ, वगैरे ठिकाणचे देसाई फितुर होऊन मिळाले होते. त्यांना प्रथम कबजांत आणण्याचे काम भाऊंनी हाती घेतले. इकडे हरिपंत तुंगभद्रेपर्यंत आले आणि ठरल्याप्रमाणे निझाम हि त्यांना तेथे येऊन मिळाला. तेव्हां हैदराने स्वतः तात्या व निझाम यांच्या सैन्याकडे रोख फिरविला. मध्यंतरी * कुमदानाकडील सूत्र रा. कृष्णरावजी ( पानसे ) यांच्या मार्फतीने महिनाभर ” भाऊंकडे लागले होते. परंतु, हैदराने बोलाविल्यावरून कुमदान तिकडे गेला ( कित्ता २९२५).