पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. जातीचा व फौजेचा असे दोन निरनिराळे सरंजाम दिले आहेत. पैकीं फौजेचा सरंजाम तनि लक्षांचा असून त्याच्यासाठी लावून दिलेला प्रांत तुंगभद्रेच्या अलीकडील कर्नाटकांत दिला होता, आणि जात सरंजामासाठी सोलापूर व नगर जिल्ह्यांतील पन्नास हजार रुपये वसुलाचीं गांवे लावून दिली होती. याच वेळीं तोफखान्याच्या मजुमेचा अधिकार जयवंतराव यशवंत पानसे यांचे नांवे करून दिला. ४. सावशीची लढाई. इकडे, कोल्हापूरकरांवर रामचंद्र गणेश कानडे, कोन्हेरराव पटवर्धन व कृष्णराव पानसे हे तिघे सरदार जे मागे पाठविले होते, त्यांचे आपसांत पटत नव्हते. इतक्यांत त्यांना पुण्याहून सरकारचा हुकूम आला की, दुसरीकडे हैदराने गडबड माजविली आहे, त्यासाठी पांडुरंगराव पटवर्धन, कोन्हेरराव पटवर्धन व कृष्णराव पानसे यांनी तिकडे जावे, व कानडे आणि परशुरामभाऊ यांनी कोल्हापूरकरांवर दाव बसण्यासाठी तेथेच रहावे ( शके १६९८ भाद्रपद ). पांडुरंगराव, कन्हेरराव व कृष्णराव पानसे हे धारवाडच्या रोखे जात असतां, त्यांना गुत्तीकर व गजेंद्रगडकर घोरपडे येऊन मिळाले. या फौजेनें लक्ष्मेश्वर, बेटगिरी, मिश्रकोट, कलघटगी, हुवळी वगैरे ठाणी घेतलीं ( मार्गशीर्ष ). हैदराचा सरदार श्रीपतराव या वेळी बंकापुरास जाऊन तळ देऊन बसला व त्याने हैदराकडे मदत मागितली. त्यामुळे हैदरानें महंमद अल्ली यास कवायती पायदळ व तोफा देऊन त्याचे कुमकेस पाठविले. त्यास दादासाहेब पेशवे यांचे सरदार वर्वे व आबाजी महादेव हे हि येऊन मिळाले. तेव्हां, पांडुरंगराव पटवर्धनांनी पुण्यास मदत मागण्याविषयी पत्रे लिहिली. ते वर्तमान ऐकून कारभाच्यांनीं निझामास आपल्याकडे वळवून घेतले व हरिपंत तात्यांना तिकडे पाठविण्यात आले. परंतु, ते येण्यापूर्वी पांडुरंगराव यांनीं अदूरदृष्टीने सावशी येथे हैदराचा सरदार कुमदान याच्याशी तोंड भिडविलें. प्रथम शिवराव घोरपडे, कृष्णराव पानसे वगैरे सरदारांनी आदल्या रात्री सावधपणाने संरक्षण केल्यामुळे कुमदानाने त्यांच्यावर हल्ला चढविला नव्हता. कुमदानाने आपला तोफखाना व पायदळ आदले दिवशी एका तुरीच्या शेतांत लपवून ठेविलें होते. मराठे आपल्या मायांत आल्यावर मागील बाजूस तुरीत लपविलेल्या सैन्याने एकदम मारा सुरू केला. मराठ्यांचे सैन्यांत डावी बाजू गुत्तीकर घोरपडे यांजकडे, उजवी बाजू कोन्हेराव पटवर्धन यांजकडे व मध्ये पांडुरंगराव व कृष्णराव पानसे तोफखान्यासह होते. प्रथम मराठ्यांनी बराच वेळ तोंड देऊन टिकाव धरला. पण, अखेरीस त्यांना मागे पाय काढावा लागला. मान्यांत कन्हेरराव पटवर्धन ठार झाले आणि पांडुरंगराव व इतर बरी च सरदार मंडळी जखमी होऊन शत्रूच्या हातीं सांपडली ( मार्गशीर्ष अमावास्या, शके १६९८ ). फक्त कृष्णराव पानसे व जनोबा पटवर्धन हे नरगुंदास कसे तरी सुखरूप परत आले. तेथून कृष्णराव तोफखान्याचे कायम ठिकाणी