५४ पाणिपतची बखर गुण त्यांच्यांत होते. गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘बाजीरावाचा दरारा व चिमाजीचे हिशेबी धोरण हे दोनही गुण सदाशिवरावाच्या अंगी असून हर एक काम तो नेटानें रगडून नेत असे. भाऊ शिपाईगिरी व कारकुनी दोन्ही कसबांत निपुण होता. (म. रि. पे. बा. पृ. ३४९, ३५१) शौर्याबरोबर हिशेबीपणा, जरव, धूर्तपणा, समयसूचकता, राज्यकारभारकौशल्य हे गुण असल्यामुळेच भाऊची निवड पानिपतच्या मोहीमेसाठी झाली असे प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचे प्रतिपादन आहे. ( पा. १७६१ पृ. १३२) बादशहा दुसरा अलमगीर याने भाऊस एक फारसी फर्मान पाठविल होते त्यावरून भाऊंचे वारभारीपण दिल्लीपर्यंत गाजलें होते हे कळून येते. निजामाविरुद्ध झालेली उदगीरची लढाई भाऊसाहेबाने जिंकली आणि तहांत मराठ्यांना साठ लक्षांचा मुलुख मिळाला. पानिपतची मोहीम दुर्दैवाने भाऊ हरले. तरी त्यांचें शौर्य आणि त्यांची हिंमत यांचा गौरवपूर्ण उल्लेख अनेक पत्रांतून, बखरींतून पाहावयास मिळतो. प्रा. न. र. फाटक यांनी पानिपतविषयक साधने संपादित करतांना भाऊंच्या स्थिरचित्तता आणि धैर्य या गुणांकडे वाचकांचे विशेष लक्ष वेधले आहे अत्यंत विपत्तीच्या कल्लोळांतही पर्वतासारखे स्थिर', 'गडद अंधकारांतही निष्कंप तेवणाच्या भाऊसाहेबांचे वीरोचित उ सामान्य धैर्यशालित्व' असा निर्देश प्रस्तावनत ते करतात. ( पा. संग्राम, पृ. १३-१४ ) पृ. २. अटकेपर्यत मुलूख काबीज - अटक हा सिंधूनदीच्या उत्तरेकडील प्रदेश. अटक ही हिंदुस्थानची हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे हद्द मानली जाई. यापलीकडे जाण्यास अटकाव होता. इ. स. १७५८, मे महिन्यांत राघोबान अटकेची स्वारी केली. मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, साबाजी शिद यांनी त्यात भाग घेतला, अटकेपर्यंत मराठी झेंडा रोविला ही राघोबाचा कामगिरी इतिहासांत प्रसिद्धच आहे. पुढे होणारे भविष्य बलवंत - पानिपतावर मराठ्यांचा झ लेला नाश आणि भाऊसाहेब विश्वासराव यांचा ओढवलेला मृत्यू याला अनुलक्षून बखरकार हे म्हणतो. बखरकाराची दैववादी वृत्ती येथे दिसते.
पान:पाणिपतची बखर.pdf/99
Appearance