पान:पाणिपतची बखर.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टापा, ५३ वश होईल तो तुमचे प्रधानपद चालवील. राज्य राखने' हे कागद म्हणजे मराठशाहीच्या सूत्रचालकत्वाची शाहूने पेशव्यास करून दिलेली सनद होय असे गो. स. सरदेसाई म्हणतात. ( ना. पे. चरित्र, पृ. ७२ ) निजधामास जाते समय - शाहूचा निधनकाल गो. स. सरदेसाई १५ डिसेंबर १७४९ हा देतात. पेशव्यांच्या शकावलींत ‘मार्गशीर्ष शुद्ध ९ स देहविसर्जन झाले ' अशी माहिती आहे तर थोरले शाहूमहाराज यांचे चरित्र यांत 'शके १६७१ ... मार्गशीर्ष वद्य तृतीया शुक्रवारी ' असा उल्लेख येतो. नानासाहेब ( इ. स. १७२१-१७६१) - थोरल्या बाजीरावाचा हा पुत्र. यालाच बाळाजी बाजीराव असेही म्हणतात. इ. स. १७४० त नानासाहेबाला पेशवाईची वस्त्रे मिळाली. यांच्या अमदानींत मराठशाहीचा मोठा विस्तार झाला. उत्तरेत अटकेपर्यंत आणि दक्षिणेत कर्नाटकपर्यंत मराठ्यांचा अमल पसरला. गो. स. सरदेसाई राज्यकत्र्यास लागणाच्या गुणांच्या दृष्टीने सर्व पेशव्यांत नानासाहेबास मुख्य मानतात. “एकंदर मराठशाहीचा विचार करितांही शिवछत्रपतींच्या खालोखाल नानासाहेबांचाच अनुक्रम लावावा लागेल’ असे ते म्हणतात. ( ना. पे. चरित्र, पृ. २११) मनुष्य स्वभावाची पारख, व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याजकडून । काम करून घेण्याचे कौशल्य, दूर विचार, शांत वृत्ती या नानासाहेबांच्या गुणांमुळेच त्यांच्या हातून राज्याचा एवढा उत्कर्ष झाला. ( ना. पे चरित्र, पृ. २१३ व म. रि. पे. बा. पृ. ४५६-४५७) नानासाहेबांस व भाऊसाहेबांस -- गो. स. सरदेसाई यांच्या मते यावेळीं भाऊ पुण्यास होते. ‘नाना तेथे भाऊ' हा वखरलेखकाचा समज असल्याने भाऊसाहेबांचा उल्लेख येथे आला असावा असे स्पष्टीकरण का. ना. साने करतात. शेडगांवकर बखरीत फक्त नानासाहेबांचाच उल्लेख आहे. भाऊसाहेब सदाशिवरावभाऊ (इ. स. १७३०-१७६१) - हा चिमाजी अप्पाचा पुत्र, निस्पृहता, तडफ, निश्चयी स्वभाव, सदाचार हे ।