पान:पाणिपतची बखर.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्ष' ५॥ १ :: नानासाहेबांस बुद्धी जहाली जे भाऊसाहेबांस रवाना करावे - ‘ नानांच्या मनात भाऊंविषयीं वाईट आले होते असा बखरीचा आशय दिसतो' हें का. ना. साने यांचे म्हणणे पटत नाहीं. उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेवर प्रथम राघोबाला पाठविण्याचा विचार होता तो बदलून भाऊसाहेबांना पाठविण्याचा निर्णय विचारपूर्वक चर्चेनंतर घेण्यांत आला असे इतिहासकार सांगतात. पडदूर येथे वाटाघाटी होऊन निर्णय ठरला. भाऊंच्या उदगीर विजयाच्या पाश्र्वभूमीवर राघोबाचा नाकर्तेपणा अधिकच खटकला आणि निश्चयी, हिमती, व्यवहार भाऊसाहेबांना पाठवण्याचा मनसबा झाला. राजवाडे, गो. स. सरदेसाई, . शं. शेजवलकर आणि शं. ना. जोशी या सर्वांचे याबावत एकमत आहे. राजवाडे यांनी खंड १ टीप २५४ मध्ये प्रतिपादन केले आहे की, दादांचा भोळेपणा हा भाऊंच्या जाण्याचे मुख्य कारण होय. मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले या वृद्ध हितशबूंना खोडणे, मनसबा खोल शहाणपणाने उरकणें म्हणून भाऊंची योजना नानांनी केली. पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेतही हाच विचार त्यांनी मांडला आहे. ‘मख्य कारण रघुनाथरावाचा नाकर्तेपणा .... प्रसंग फार बिकट होता. गृहशत्रू व परशत्रूपुढे राघोबासारख्या भोळ्या सांबाचा टिकाव न लागतां ... भाऊसारखा पंचतंत्री मुत्सद्दी हवा होता. तेव्हां हिंदुस्थानांत त्याची रवानगी करून देण्यांत बाळाजी बाजीरावाने आपल्या विचार शक्तीचा केवळ गौरव केला.' (ऐ. प्र. पृ. ६३-६४) गो. स. सरदेसाई यांनी जवळजवळ असेच विवेचन केले आहे. पटदूरचा निर्णय ( म. रि. पे. बा., पृ. ३४८-३५४) प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, उदगीरच्या जयाचा राजकीय परिणाम रावोवादादा उत्तरेत जावयाचा त्या ऐवजी भाऊसाहेबांची नेमणूक त्या कामावर झाली हा होय. (पा. १७६१, पृ. ४५) शं. ना. जोशी यांनी नानासाहेब व भाऊसाहेब यांना उत्तरेकडील बोलावणीं होती याचा उल्लेख केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव