पान:पाणिपतची बखर.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ पानिपतची बखर दोघांचा तिला मत्सर वाटे. राज्यकारभारांत ढवळाढवळ करण्याची तिला हौस होती. पतीच्या निधनानंतर राज्यकारभार आपल्या हातात घेता येईल असे तिला वाटत होते. परंतु माधवरावांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे ते अशक्य झाले. माधवरावाने 'रास्त्यांना शासन केलें हें पाहून ही मानी स्त्री नाशिकजवळ गंगापुरास जाऊन राहिली. रघुनाथराव, नाना फडणीस यांनी तिला पुण्यास यावे म्हणून वारंवार लिहिले पण तिने आपला हट्ट सोडला नाहीं. गोपिकाबाई अतिशय दुर्दैवी स्त्री होती. तिच्यावर मोठे आघात झाले. थोरला पुत्र विश्वासराव पानपतावर पडला. दुसरा माधवराव अकाली निधन पावला व त्याची पत्नी रमाबाई सती गेली. तिसरा पुत्र नारायणराव याचा खून झाला. यामुळे वैराग्य येऊन ती पंचवटींतील मठांत जोगीणीप्रमाणें कांहीं दिवस राहिली. नातू सवाई माधवराव जन्मला व त्याच्या नांवे बारभाईंनी राज्यकारभार सुरू केला तेव्हा ती परत गंगापुरास गेली. इ. स. १७८८ मध्ये तिचा मृत्यू झाला. शाहू महाराज (इ. स. १६८२-१७४९) - संभाजी महाराजांचा शाह हा पुत्र. इ. स. १६८९ त संभाजी महाराजांचा वध झाला आणि शाहू औरंगजेबाच्या हातात पडला. पुढची १८ वर्षे तो औरंगजेबाच्या कैदेत होता. ऐन उमेदीचा काळ जनानी छायेत कंठण्याची पाळी त्याच्यावर आली. यामुळे त्याचा स्वभाव मृदु व नि:सत्व बनला. औरंगजेबाच्या मत्यनंतर अझमशहाने मराठ्यांच्या राज्यांत दुफळी व्हावी या हेतून इ. स. १७०७ मध्ये त्याला बंधमुक्त केले. या कठीण प्रसंगी उदार, परोपकारी स्वभावामुळेच शाहूचा निभाव लागला. अनेकांचे अन्याय त्यान पोटांत घातले. बाळाजी विश्वनाथ व बाजीराव, चिमाजी यांचा पराक्रम, सेवा जाणून शाहूने त्यांना हाताशी धरून उत्तर हिंदुस्थानांत राज्यविस्तार साधला. आपल्या पश्चात मराठी राज्याचा कारभार कसा चालावा यासंबंधी शाहूने स्वदस्तुरचे कागद नानासाहेब पेशव्यास करून दिले. त्यांत म्हटले आहे - ‘राजमान रा।। बाळाजी पंडित प्रधान आज्ञा जे. राज्यभार तुम्ही चालवाल हा भरंवसा स्वामीस आहे. तुमचे मस्तकीं हात ठेविला अहि।