पान:पाणिपतची बखर.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ पाणिपतची बखर केली. तेव्हां लष्कर धूम्रे करून आच्छादून गेले. दोन हजार भांडी व पंचवीस हजार जेजाला व हेकले व सुतारनाला व जंबुरे, पंचवीस हजार बाण व करोळाचा मार दुरस्ता निमिष न लागतां एकाएकीं केला. आधीं गारदी शस्त्रसंधानीं चतुर, वावगा यावाज जाऊ द्यावयाचा नाहीं. भडिमाराची सीमाच केली. परंतु तितका आगीचा मार पेऊन, जिवाची आशा न बाळगितां, तोफखान्यांत अबदल्ली सरमिसळ जाहले. तेथे इराणी कडील मातबर सरदार पडले. याशिवाय पठाण रोहिले यांसि गणित करितां वीस हजार तेथेच ठार पडले. याजखेरीज दहा हजार पठाण जखमी जाहला. तितक्यासही आंग देऊन बहूत मारामारी केली. वीस हजार गारदी अगदीं मारून वत्तल केली. खांसा इभ्रामखान त्यांचा सरदार खांसा ठार पडला. इराणीने तोफखाना मागे टाकून विश्वासरावावर चालून आला तो यशवंतराव पवार व मातबर सरदार याँनीं सतीचे वायन घेऊन म्हणों लागले की, । आतां कांहीं जीव वाचावयाची आशा नाही; मारून गर्दै होऊन जावें". असा निश्चय करून आपले कबिले यांच्या समशेरी करून शाकाप्राय3 केल्या आणि नीटच पुढे चालले. एका आंगीं आले; कांहीं जिवाची तमा धरिली नाहीं. तीन चार घटका शस्त्रांचे खणखणाट जाहले. कोणी कोणास हाटले नाहीं. पुढील पाय पुढे, याप्रमाणे वीरश्रीच्या तवके५ करून रक्तोदके सुस्नात होऊन क्षतभूषणे परम भयानक शरीरें शोभलीं. एक धारातीर्थी आ म चे ज ड ले, एक शूरत्व करून विराले, इक मृत्यूपंथास गेले, एक पायातळीं रगडिले, एकाचे शीर तुटून भूमीस पडले, एकाचीं उदरे विदारलीं, एक रणांगणीं मूछित पडले, असे युद्ध महाभारती हि राणी व रं ना द करिते जाहले. वीर मारामार करून दमले. घे घे ह्या शब्दाची ध्वनी उठली कर्णबधिर जाहले. आपपारखी ६ ओळख न राहिली. अगदी गर्दी होऊन गेली. हणवंताप्रमाणे एका परीस एक जुझो लागले वीरां अंगी वीरश्रीचा संचार. (१) भांडीं-नलिकायंत्रे. (२) वावगा-फुकट. (३) शाकाप्राय-भाजीचे तुकड करतात तसे. (४) एका अंगी येणे-स्वतंत्र युद्ध करणे. (५) तवकेत्वेषाने, आवेशाने. (६) आपपारखी-आपण व परके. (७) हुणवंतहनुमः न. राट था। १३ ६ ६ ४८अ घेऊ. ) ; पर यौ, ४११ ०७