पान:पाणिपतची बखर.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ रघुनाथ यादव-विरचित ममता अतिशय दाटली. सद्गदीत होऊन म्हणों लागला जे, “ आतां आम्हीं वांचून काय करावे ? आपण मरावे यांत उत्तम आहे. " म्हणून सक्रोधशरित होऊन, परमप्रतापी रणरंगाची वस्त्रे शस्त्रे तरकस कमाना चढवून अंबारींत बसला, आणि माहुतास हुकूम फर्मविला जे, “ हत्ती फौजेंत ढकलगे. मारतां मारतां मरावे.' हा सिद्धांत अबदल्ली आपले मनांत करून गोठांतून शिलेपोस होऊन पन्नास हजार फौजेनिशीं निघाला. त्या समयीं इराणी व ननसूर अली वगैरे तेही लक्ष दीड लक्ष फौजेनिशीं निघाले. हे वर्तमान सदाशिवपंत व नामीं नामी सरदार यांस कळले. तेव्हां फौजेनिश माघारी फिरले. फौज अगदी जर्जर जाहली. प्रातःकाळापासून तासपर्यत संग्राम करून शिणोन गेले. सायंकाळ एक तास दिवस राहिला. अगदीच दिवसाचे उपवासी, लोक व घोडीं शिणोन गेली. आणि अमित्र शत्रू तो इराणी माघारी फिरले. तेव्हां सदाशिवपंत सवस बोलावून बोलले जे, * होणार ते वळोत्तर, ते कदापि सुटणार नाही. तदनुरूप घडून येते. श्रीसांबाचे मर्जीस आलें असेल ते तसेच घडून येईल. आतां यमाजी चिठ्ठी घेऊन खांना खिजमतगारच आला असा दिसतो. कांहीं घेऊन गेल्याशिवाय जात नाहीं. पुन्हा युद्ध | न ] करितां गती नाही. तेव्हां मल्हारजी होळकर व जनकोजो शिदे यांनी विचार केला कीं, “ आतां मार्गं न फिरावें तो असा पाठीवर घेऊन गोटांत अणावा. आणि निशा समयीं निशाचर यांचा निःपात करावा.' ते समयीं सदाशिवपंत भाऊ यांणीं उत्तर दिले जे, “होणार ते होते त्यास इलाज नाहीं." सदाशिवपंत माघारे फिरले. आणि बोलले कीं, पुन्हा तीन टोळया करणे आणि युद्धास प्रवर्तान, डावे बाजूस विश्वासराव, उजवे बाज स जनकोजी शिंदे लहान थोर सरदार, मध्यभागीं सदाशिव पंत, पंचवीस हजार फौजेनिशीं किरीटीप्रमाणे सांवरून रणरंगधीर उभे राहिले. तों परम आवेशे इराणी व अबदल्लीनी एक लक्ष पठाणांनिशीं विश्वासराव यांजवर चालून घेतले. प्रथम तोफखान्यावरच आले. तोफखाना तयारच होता. त्याजवर पडले. तेथे मुख्य इभ्रामखान याने धीर धरून एकदांच तोफांची सरबत्ता

(१) तासपर्यत–किती तो आकडा गाळलेला. (२) किरीटी-अर्जुन.