पाणिपतची बखर ४७ जाहाल्या. कितीएक पुरुष शिपाईगिरीचे अहंकारों ते बद्रिकाश्रमास वगैरे पवित्र जागां तपस्वी तपश्चर्येस गेले. कितीएक हातापायांनी अधू जाहाले आणि भाऊबंद लढात ईं गर्क जाहाले, आतां देशीं काय जावे, या कारणास्तव गंगाप्रवाहीं व यमुनाप्रवाही कितीएकांनी घालन घेतले. कितीएकांनीं राज्यलोभे प्रयागीं जाऊन करवत घेतले. कितीएक आभर जहाले. कितीक दरिद्री जाहाले. ते पत्री कोठवर लिहावें ? ४४. यथामतीनें बखर सजविली 1 एक बारनीस शत्रूकडील व श्रीमंतांकडील या उभयतांच्या दिनचर्येचें वर्तमान दफात्यास चिटणिसांनीं बार केली त्यांची संगत पाहून, कच्चा मजकूर सेवेशीं निवेदन करावयाकरितां यथामतीने बखर सजवून सेवेशी पाठविली आहे. शके १६८४४ चित्रभानुनाम संवत्सरे माहे फाल्गुन शुद्ध ५ मंदवासर मक्काम पुणे. मागून नवल विशेष वर्तमान होईल ते सेवेशीं सेवक निवेदन करतील. बहूत काय लिहिणे ? सेवकावर लोभाची बुद्धी दिवसेंदिवस निरंतर व्हावी सेवेशीं श्रुत होय हे विज्ञापना. ही किताबत". पष्ठ ४० ओळ १ टीप यांत दर्शविलेला प्रत ४ मधील मजकूर निराळाच आहे तो येणेप्रमाणे:- तिकडे अबदल्लीच्या पुत्राचें वर्तमान कीं, पुत्र अपमान होऊन सेनेचा पराभव केला. असे ऐकून दुईट दुःख प्राप्त झाले. ते समयीं पुत्रशोकाची ད ང (१) करवत घेतले-संगमांत जलसमाधी घेतली. का. ना. साने म्हणतात, * पढील जन्मीं राज्य मिळावे एतदर्थ गंगा आणि यमुना यांच्या संयुक्त प्रवाहाच्या कत्रीमध्ये जलसमाधी घेतली. (२) आभर-संपन्न; श्रीमंत. (३) दफातें-स्मरणवही. या वहीत ज्या ज्या गोष्टी घडतील त्या त्या टिपून पत्रे व इतर कागदही नोंदून ठेवायचे. (४) नागपूर प्रत-शके १६८३ वृषानाम संवत्सरे फाल्गुन शु।। ५ मंदवार. (५) पुणे प्रत १-इतकेच अपुरे वाक्य आहे. पुढील प्रत कोणाची, कधी लिहिली हा मजकूर फाटलेला दिसतो. भिवंडी प्रतीतील शेवटची माहिती -व्रत कोणाचो, कोठे लिहिली प्रस्ताकनेत दिली आहेच. ।। ८ ।।
पान:पाणिपतची बखर.pdf/92
Appearance