४६ रघुनाथ यादव-विरचित साहेब यांचे स्वरूप गिलचे अवदल्ली व मनसूरअली आणि सुजातदौले व इराणीकडील सरदारांनीं पाहून बहूत श्रम पावले, आणि म्हणू लागले की, 1' असल्या मोहयास कोणी गोळी घालून मारिला ? जिवंत अंबारीसुद्धा धरून आणावयाचा होता. तुम्हीं मारिला हें ठीक केले नाही.' असे म्हणून सर्वानीं धरणीवर शरीरे टाकून हाय हाय ! करू लागले. कोणी आपल्या पदराने अशुद्ध पुसू लागले. कोणी मुखाशीं मुख लावू लागले. तेव्हां शत्रुकडील सरदारांनी तालिमात केली की, “ त्यांजकडोल लष्करांतून गोळा लागली आणि हक्क जहाले. याचा दोष आमचेकडे नाही. मग अवदल्ली वगैरे यांणीं कबर बांधावयास हकूम दिला. तेव्हां अनुपगीर गोसावी, चरणगीर ४ गोसावी वगैरे रजपूत व रांगडे यांणीं अबदल्ली अर्ज केला की, १६ आमचा हिंदूचा मुर्दा, त्यांत पेशवे बहादूर यांतील खासा धनी, यांचे थडगे किंवा छत्री काय करणे ती आम्ही करू. मुसलमाना एकंदर करू देणार नाही. याविषयी आम्ही सर्व हिंदू लढाईत मजबूत आहों, यांत अंतर नाहीं अशी प्रत्युत्तरे गोसावी यांची वगैरे अबदल्ली व दिल्लीपत बादशाहा वगैरे यांनी ऐकन प्रेत त्यांचे हवाली केले. ४३. सर्वस्व बुडालें । पूरुषात देखणा विश्वासराव साहेब किवा बायकांत देखणी सस्तानीबाई साहेब, समशेर बहादूर यांची मातोश्री, अशी दोन माणसे दक्षिणेत स्वरूपाने जाहालीं. श्री० नानासाहेब अंशधारी पुरुष, त्यांत शाहू महाराज छत्रपती यांचा वरदहस्त मस्तकीं, तेणेकरून सर्व पेशव्यांचे वंशातील पुरुष जय संपादीतच आले. शेलके घोडे व शेलके माणूस व शेलके हत्ती, शेलक्या मांडणी साठ कोस नित्य चालणार व शेलकें जवाहीर व शेलकी तलवार व शेलक्या तोफा वगैरे शेलकें साहित्य सोनपत पानपत कुंजपूर व दिल्ली वगैरे ठिकाणी सर्वस्व बुडालें. वि तीएकांची घरे बसलीं. कितीएकांच्या नकला ( १) श्रम पावणे-दुःखी होणे. (२) तसलिमात-प्रमाणपर्वक विनता • (३) कबर बांधणे-पुरणे. (४) पुणे प्रत १ व भिवंडी प्रत- यात ‘ चरण शीर' हे नांव नाही. भाऊसाहेबांच्या बखरीत ‘उमरावगीर' हे नांव आले टे (५) अंशधारी-अवतारी-ईश्वराच्या अंशाचा अवतार. (६) नकः। होणे-निर्वश होणे.
पान:पाणिपतची बखर.pdf/91
Appearance